AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांची झोप उडवणारी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार, RBI ने दिले संकेत

Petrol Diesel Price Hike : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी इंधनाच्या किमतीबाबत मोठं भाकित केलं आहे. आगामी काळात इंधनाच्या किमती वाढू शकतात असं मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.

सर्वसामान्यांची झोप उडवणारी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार, RBI ने दिले संकेत
Fuel Price and RBI StatementImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 13, 2026 | 3:27 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. याचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे भारतातही या किमती वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी इंधनाच्या किमतीबाबत मोठं भाकित केलं आहे. आगामी काळात इंधनाच्या किमती वाढू शकतात असं मल्होत्रा यांनी म्हटलं आहे, त्यामुळे सर्वसामान्यांची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता

स्वित्झर्लंडमधील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत मल्होत्रा यांनी सांगितले की, ‘जागतिक तणाव दीर्घकाळ कायम राहिला तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू शकतात. सध्या सरकार आणि सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा भार स्वतः उचलत आहेत, मात्र ही परिस्थिती जास्त काळ टिकवणे सोपे राहणार नाही. सरकारने सध्या उत्पादन शुल्क (एक्साइज ड्युटी) कमी ठेवले आहे आणि सरकारी तेल कंपन्याही तोटा सहन करत ग्राहकांवर संपूर्ण भार टाकत नाहीत. पण युद्ध आणि तणाव दीर्घकाळ चालू राहिल्यास किंमतवाढीचा फटका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो.’

पंतप्रधान मोदींकडून इंधन कपातीचे आवाहन

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी पेट्रोल-डिझेलचा कमी वापर करण्याचा आणि सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. देशाचा परकीय चलनसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सरकारने सोन्यावरील आयात शुल्कही दुपटीपेक्षा अधिक वाढवले आहे. आता आगामी काळात आयातीत वस्तूंची मागणी कमी करण्यासाठी आणखी काही पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

महागाईवर दबाव वाढला

भारतात किरकोळ महागाई एप्रिलमध्ये वाढून 3.48 टक्क्यांवर पोहोचली, जी मार्चमध्ये 3.40 टक्के होती. हा आकडा अंदाजापेक्षा कमी असला तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कच्च्या तेलाच्या किंमती सतत वाढत राहिल्यास महागाईवरील दबाव आणखी वाढू शकतो. आखातातील तणावामुळे पुरवठा साखळीवरही परिणाम होत आहे. मालवाहतूक आणि तेलपुरवठ्यात अडचणी वाढल्यास त्याचा परिणाम पुढील काही महिन्यांत भारतीय बाजारपेठेवर जाणवण्याची शक्यता आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?