AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती खिसा कापणार, वाचा आजचे दर

तेल कंपन्या या रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करतं. यानुसार, आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती खिसा कापणार, वाचा आजचे दर
| Edited By: | Updated on: Feb 04, 2021 | 9:16 AM
Share

मुंबई : पेट्रोल (Petrol Price) आणि डीजलच्या (Diesel Price) बदलणाऱ्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. यामुळे रोज म्हटलं तरी आपलं आर्थिक धोरणं बिघडतं. अशात सगळ्यांची नजर ही आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर आहे. खरंतर, तेल कंपन्या या रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करतं. यानुसार, आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. (petrol diesel price today here know the latets fuel rates in your city)

गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये 30 पैसे ते 40 पैश्यांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी बुधवारी इंधनाच्या दरांमध्ये 20 ते 25 पैशांनी वाढ केली गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच पुन्हा एकदा भाव वाढवण्यात आले आहेत. इंडियन ऑईल वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव 86.65 रुपये प्रति लीटर होता. तर मुंबईमध्ये तो 93.20 रुपये लीटर होता. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर रेट 88.01 रुपये प्रति लीटर आणि चेन्नईमध्ये 89.13 रुपये प्रति लीटर आहे.

मुख्य शहरांमधील पेट्रोलच्या किंमती

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 86.65 रुपये प्रति लीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 93.20 रुपये प्रति लीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 88.01 रुपये प्रति लीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 89.13 रुपये प्रति लीटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 85.91 रुपये प्रति लीटर

प्रमुख शहरातील डिझेलचे दर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 76.83 रुपये प्रति लीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 83.67 रुपये प्रति लीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 80.41 रुपये प्रति लीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 82.04 रुपये प्रति लीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 77.24 रुपये प्रति लीटर

आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किमती तपासा

एसएमएसद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील आपल्याला समजू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवरून मेसेज करावा लागेल आणि तुम्हाला तुमच्या फोनवर संपूर्ण माहिती मिळेल. आपल्या मोबाईलमध्ये आरएसपी आणि आपला शहर कोड लिहा आणि 9224992249 या नंबरवर पाठवा. आपल्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे दर त्वरित आपल्या शहरासह येतील. प्रत्येक शहरासाठी कोड वेगवेगळे आहे, जो आपल्याला आयओसी वेबसाईटवर सापडेल. आपण आयओसीचे मोबाईल अॅप देखील डाऊनलोड करू शकता.

दररोज सकाळी किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. (petrol diesel price today here know the latets fuel rates in your city)

संबंधित बातम्या – 

50 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा सोनं, 5 फेब्रुवारीपर्यंत सरकारची खास योजना

नव्या Vehicle Scrappage Policy मुळे कार आणि बाईकची किंमत किती?; एका क्लिकवर सर्व माहिती

फक्त 50 हजार लावून कमवा 2.50 लाख, आताच सुरू करा डबल फायदा असलेला ‘हा’ बिझनेस

(petrol diesel price today here know the latets fuel rates in your city)

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद