AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलची लवकरच स्वस्ताई, आनंदवार्ता वाचली का? झपटपट चेक करा आजचा भाव

Petrol Diesel Prices Today 2 October 2026 : जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर घसरले असले तरी आखाती देशातील संकट कमी झालेले नाही. रशियासोबतच इराककडूनही स्वस्तात इंधन मिळाल्यास देशात पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येऊ शकते? काय आहे आजचा भाव?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलची लवकरच स्वस्ताई, आनंदवार्ता वाचली का? झपटपट चेक करा आजचा भाव
पेट्रोल आणि डिझेलचा भाव काय
| Updated on: Oct 02, 2026 | 6:43 AM
Share

अमेरिकेच्या संसदेने मंजूर केलेल्या बिलानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतासह इतर काही देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा अधिकार मिळाला आहे. यामुळे रशियाकडून होणारी इंधन खरेदीला ब्रेक लागेल. तर दुसरीकडे अमेरिका आणि इराककडून स्वस्तात इंधन मिळण्याचा पर्याय खुला होऊ शकतो. एका वृत्तानुसार, भारतीय तेल कंपन्यांनी आता रणनीती बदलली आहे. कंपन्या होर्मुज समुद्रध्वनीतून भाड्याच्या जहाजातून तेलाची आयात करत आहे. याचा परिणाम काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर दिसण्याची शक्यता आहे. या धोरणाचा चांगला परिणाम दिसण्याची शक्यता आहे. काय आहेत आज पेट्रोल आणि डिझेलची किंमत?

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यात इंडियन ऑईल कॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतीय पेट्रोलियम, एचपीसीएल, मित्तल एनर्जी लिमिटेड ने फ्री ऑन बोर्ड या आधारावर इराककडून कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. या आधारे किरायावर जहाज घेऊन त्याआधारे कच्चा तेलाची आयात करण्यात येत आहे. हे मोठे पाऊल मानल्या जात आहे.

आजचा कच्चा तेलाचा भाव

ब्रेंट क्रूड तेलाचा किंमत आज वधारला. 97.90 डॉलर या भावावरून किंमत आज 101 डॉलर प्रति बॅरल इतकी झाली. तर अमेरिकेच्या WTI कच्चा तेलाचे दर काल 90.42 ते 90.67 डॉलर इतका होता, आज भाव 92 डॉलर प्रति बॅरल होता. ओपेकचा कच्चा तेलाचा भाव जवळपास 111.80 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे.

देशातील प्रमुख शहरातील दर काय?

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलचा भाव 111.21 रुपये तर डिझेलची किंमत 97.83 रुपये इतकी आहे.

दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये तर डिझेलचा भाव 95.20 रुपये असा आहे.

चेन्नई: दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईत पेट्रोलचा भाव 107.76 रुपये तर डिझेलची किंमत 99.55 रुपये अशी आहे

कोलकत्ता: पूर्वेतील या शहरात पेट्रोलची किंमत 113.51 रूपये तर डिझेलची किंमत 99.82 रुपये आहे.

किंमती एका SMS वर

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.

इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.

बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.

त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.

त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर