Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल भरायला जाताय? ट्रम्प यांच्या त्या कृतीने कच्चा तेलाला उकळी? किंमत जाणून घ्या
Petrol-Diesel Price Today: आखाती देशात तणाव आहे. तर दुसरीकडे अचानक कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. ट्रम्प यांच्या त्या कृतीने कच्चा तेलाला उकळी फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहेत आज पेट्रोल आणि डिझेलची किंमत?

Petrol-Diesel Price Today: आखाती देशात अजूनही तणाव असला तरी कच्चा तेलाच्या किंमतीत 2.5 ते 3.5 टक्के इतकी घट झाली आहे. ब्रेंट क्रुड आणि डब्लूटीआयच्या किंमती झरझर खाली उतरल्या आहेत. पण ट्रम्प यांच्या त्या कृतीने जगाचा जीव टांगणीला लागला. जर्मनी या देशात पेट्रोल आणि डिझेलचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहचला आहे. सरकारला इंधनावरील कर कमी करण्याची वेळ आली आहे. तिथल्या सरकारने 17 सेंटपर्यतं कर कपात करण्याचे धोरण राबवले आहे. तर दुसरीकडे भारतात आज तेलाच्या काय आहेत किंमती ते जाणून घ्या
कच्चा तेलाची किंमत झरझर उतरली
जगातील अनेक भागात युद्ध आणि तणाव असतानाही कच्चा तेलाच्या किंमतीत 2.5 ते 3.5 टक्क्यांची घसरण झाली. सौदी अरबने लाल समुद्रावरील यानबु बंदरातून तेलाची जहाजं रवाना केली आहेत. सौदी अरबचा इंधन पुरवठा पुरवत सुरू झाल्याने जगाचा जीव भांड्यात पडला. तर दुसरीकडे होर्मुझ समुद्रधुनीतून इंधन पुरवठा पुरवत होण्याची चिन्ह आहेत. पण ट्रम्प यांनी शांतता करारात खोडा घातल्याने अजूनही जागतिक बाजारात भीतीचे वातावरण आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लवकरच युद्ध बंद होण्याचा दावा केला. आपल्या अधिकाऱ्यांनी इराणशी संपर्क साधल्याचा दावा केला. पण अतिरिक्त माहिती देण्यास नकार दिला. या सर्व घाडमोडींचा परिणाम कच्चा तेलावर झाला आहे. जर ट्रम्प यांनी युद्ध समाप्तीची घोषणा केली तर बाजारात तेलाच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते.
आजचा कच्चा तेलाचा भाव
ब्रेंट क्रूड तेलाचा किंमत आज 97.90 डॉलर इतका आहे. हा भाव काल 105 ते 106 डॉलर प्रति बॅरल होता. तर अमेरिकेच्या WTI कच्चा तेलाचे दर 90.42 ते 90.67 डॉलर इतका आहे, काल हा भाव 93 ते 94 डॉलर प्रति बॅरल होता. ओपेकचा कच्चा तेलाचा भाव जवळपास 111.80 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे.
देशातील प्रमुख शहरातील दर काय?
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलचा भाव 111.21 रुपये तर डिझेलची किंमत 97.83 रुपये इतकी आहे.
दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये तर डिझेलचा भाव 95.20 रुपये असा आहे.
चेन्नई: दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईत पेट्रोलचा भाव 107.76 रुपये तर डिझेलची किंमत 99.55 रुपये अशी आहे
कोलकत्ता: पूर्वेतील या शहरात पेट्रोलची किंमत 113.77 रूपये तर डिझेलची किंमत 99.82 रुपये आहे.
किंमती एका SMS वर
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
