Petrol Diesel Price Hike | पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार! तोटा भरुन काढण्यासाठी सरकारी कंपन्या तुमच्या खिश्यात घालणार हात

Petrol Diesel Price Hike | सध्या राज्यासह देशभरात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. पण लवकरच तुमच्या खिश्याला झळ बसू शकते . इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडला (IOCL) पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर अनुक्रमे 10 रूपये आणि 14 रुपये प्रति लिटर तोटा झाला आहे.

Petrol Diesel Price Hike | पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार! तोटा भरुन काढण्यासाठी सरकारी कंपन्या तुमच्या खिश्यात घालणार हात
बांग्लादेशात पेट्रोलचे दर एकाच दिवसात डबल, तरीही भारत त्याच दराच्या जवळपास, दरातला फरक किती?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 11:02 AM

Petrol Diesel Price Hike | सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात कसलीही दरवाढ केलेली नाही. राज्यासह देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Rate Today) स्थिर आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईत लोकांना दिलासा मिळाला आहे. 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी केले होते. त्यामुळे इंधनाचे दर घसरले होते. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला (IOCL)पेट्रोल-डिझेल विक्रीत(Petrol-Diesel Rate) तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीने पहिल्यांदाच तोट्याची (Loss) नोंद केली आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्या येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवू शकतात. IOC, BPCL आणि HPCL या सरकारी मालकीच्या (Government) तेल कंपन्यांनी गेल्या वर्षी दिवाळीनंतर इंधन दरात कुठलाही बदल केला नव्हता. तोटा होत असताना ही या कंपन्यांनी दरवाढ रोखून धरली होती. उत्तर प्रदेशासह इतर काही राज्यांच्या निवडणूका (Election) पार पाडल्यानंतर कंपन्यांनी धडाक्यात दरवाढ केली. मार्च ते एप्रिल या महिन्यात कंपन्यांनी तब्बल 14 वेळा दरवाढ केली.आता तोटा भरुन काढण्यासाठी कंपन्या ग्राहकांच्या खिश्यात हात घालतील. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची (Inflation) झळ लागण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील आजचे इंधन दर

राज्याची राजधानी मुंबईत सोमवारी पेट्रोलचे दर 105.96 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमती 92.48 रुपये प्रति लिटर आहे. तर नवी मुंबईत पेट्रोलचे दर 106.42 प्रति लिटर आणि डिझेलचे भाव 94.38 रुपये प्रति लिटर आहे. पुणे शहरात आज पेट्रोलचे दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमती 94.27 रुपये प्रति लिटर आहे. तर नाशिकमध्ये आज पेट्रोलचे दर 106.77 प्रति लिटर आणि डिझेलचे भाव 93.27 रुपये प्रति लिटर आहे. नागपूर शहरात आज पेट्रोलचे भाव 106.06 प्रति लिटर आणि डिझेलचे भाव 92.61 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर 106.55 प्रति लिटर आणि डिझेलचे भाव 93.08 रुपये प्रति लिटर आहे. औरंगाबाद शहरात पेट्रोलचे दर 107.98 प्रति लिटर आणि डिझेलचे भाव 95.94 रुपये प्रति लिटर आहे.

हे सुद्धा वाचा

कच्चे तेल प्रति बॅरल 100 डॉलर

रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद जागतिक बाजारावरही दिसून येत आहेत. त्यामुळे कच्च्या इंधनाच्या किंमती कडाकडल्या आहेत. अनेक दिवसांपासून कच्चे तेलाचे भाव प्रति बॅरल 100 डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनाही या वाढीव दराने तेल आयात करावे लागत आहेत. परंतू, सरकारने जाहीर केल्याप्रमाणे भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेलही खरेदी केले आहे. पण त्याचे बाजारातील मूल्य किती याची माहिती अद्याप उघड झालेली नाही.

कंपन्या ठरवतात भाव

जून 2010 पर्यंत सरकार पेट्रोलचे दर ठरवत असे. दर 15 दिवसांनी त्यात बदल केला जात असे. 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. तर ऑक्टोबर 2014 पर्यंत डिझेलचे दरही सरकारच ठरवत होते. मात्र 19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने ही जबाबदारी कंपन्यांच्या खाद्यावर टाकली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आदी गोष्टींआधारे तेल कंपन्या इंधन दर ठरवतात. पण दर ठरवण्याच्या प्रक्रियेवर अप्रत्यक्षरित्या सरकारचेच नियंत्रण असते हे अनेकदा समोर आले आहे.

इंधन दर एका SMS वर

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज SMS द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या (IOC) ग्राहकांना RSP<डीलर कोड> टाकून 9224992249 या क्रमांकावर तर एचपीसीएल (HPCL) ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवावा . बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP<डीलर कोड> असे लिहून 9223112222 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर लागलीच तुम्हाला तुमच्या शहरातील आजचे इंधन दर मिळतील.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.