Petrol Diesel Rate: इंधन दरवाढीला ब्रेक, सलग सहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या भावात वाढ नाही; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

| Updated on: Apr 12, 2022 | 7:41 AM

पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी आज पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जारी करण्यात आले आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे आज पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate Today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Petrol Diesel Rate: इंधन दरवाढीला ब्रेक, सलग सहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या भावात वाढ नाही; सर्वसामान्यांना मोठा दिलासा
पेट्रोल डिझेलचे दर स्थिर
Image Credit source: TV9
Follow us on

पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी आज पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जारी करण्यात आले आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे आज पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate Today) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज इंधनाचे दर स्थिर आहेत. गेल्या सहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाहीये. सहा एप्रिल रोजी इंधनाच्या दरामध्ये शेवटची दरवाढ करण्यात आली होती. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचे दर 96.67 रुपये प्रति लिटर आहेत. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये प्रति लीटर तर डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 110.85 आणि 100.94 रुपये आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल (Petrol) प्रति लिटर 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये लिटर आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यभरात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 रुपये प्रति लीटर तर डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल प्रति लिटर 121.76 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 120.11 रुपये लिटर तर डिझेल 102.82 रुपये लिटर आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 120.15 आणि 102.89 रुपये लिटर आहे. तर पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 120. 30 तर डिझेल 100. 20 रुपये लिटर आहे.

22 मार्चनंतर इंधनाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ

चार नोव्हेंबर 2021 रोजी केंद्राने इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने, पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर मागे दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर तब्बल चार महिने इंधनाच्या किमती स्थिर होत्या. मात्र त्यानंतर 22 मार्च 2022 नंतर इंधनाच्या किमतीमध्ये दरवाढ करण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांमध्ये इंधनाच्या किमती लिटरमागे दहा रुपयांपेक्षा अधिक महागल्या आहेत. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा सहा दिवसांपासून इंधनदर वाढीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

आरबीआयकडून आणखी चार बँकांवर कारवाई, राज्यातील तीन बँकांचा समावेश

राजलक्ष्मी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये फ्रॉड ट्रेडिंग, सेबीकडून 13 कंपन्यांना 40 लाखांचा दंड

काय सांगता? पेट्रोल-डिझेल खरंच स्वस्त होणार? उत्पादन शुल्क कपातीबाबत केंद्राचा विचार सुरु