AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol Price : सुपर पॉवर बँकफुटवर! देशात पेट्रोल-डिझेलची लवकरच स्वस्ताई?

Today Petrol Price : आता जगाचा दादा असलेली अमेरिका अखरे भारतासमोर नरमली. त्यामुळे स्वस्तात कच्चे तेल खरेदी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आता आडकाठी उरली नाही. त्यामुळे भारतात लवरकच पेट्रोल-डिझेलचे दर कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Today Petrol Price : सुपर पॉवर बँकफुटवर! देशात पेट्रोल-डिझेलची लवकरच स्वस्ताई?
लवकरच स्वस्ताई
| Updated on: Feb 10, 2023 | 8:38 AM
Share

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरु झाल्यापासून अमेरिका आणि पश्चिमी देशांचा भारतावर दबाव वाढला होता. भारताने रशियाशी व्यापारी संबंध तोडण्यासाठी भारतावर दबाव वाढविण्यात आला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावर ठाम राहिले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये रशियाकडून भारत केवळ 0.20 टक्के कच्चे तेल (Crude Oil) खरेदी करत होता. त्यानंतर आता हा वाटा 25 टक्क्यांवर पोहचला आहे. भारत रशियाकडून दररोज 909403 बॅरलहूनही अधिक कच्चे तेल आयात करतो. अमेरिकेसह पश्चिमी राष्ट्रांनी (America-European Countries) त्याला तीव्र हरकत घेतलेली असतानाही भारताने स्वतंत्र भूमिका कायम ठेवली. अखेर आता सुपर पॉवर अमेरिकेने भारताच्या निर्णयाचा आदर असल्याची भूमिका जाहीर केली. रशियाकडून कच्चे तेल खरेदीला कुठलीही आडकाठी आणणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे रशियाकडून मोठ्या प्रमाणात क्रूड ऑईल खरेदीचा मार्ग आणखी मोठा होणार आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारात लवकरच दिसून येण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल-डिझेल दरात (Petrol-Diesel Price)कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतावर अमेरिकेचा दबाव अर्थहीन झाला. अमेरिकेचे सहायक सचिव करेन डोनफ्राईड यांनी जागतिक मंचावर रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेची हरकत नसल्याचे जाहीर केले. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर प्रतिबंध घालण्याचा विचार होत नाही. भारत रशियाकडून त्याच्या मागणीनुसार तेल खरेदी करु शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. एएनआयच्या अहवालातही अमेरिकेने भारताला मोकळीक दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

  1. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही
  2. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहेअहमदनगर पेट्रोल 106.51 तर डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.66 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत 107.50 तर डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.85 पेट्रोल आणि डिझेल 94.31 रुपये प्रति लिटर
  6. नागपूरमध्ये पेट्रोल 106.14 तर डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  7. नांदेडमध्ये पेट्रोल 108.08 तर डिझेल 94.56 रुपये प्रति लिटर
  8. जळगावमध्ये पेट्रोल 107.56 आणि डिझेल 94.05 रुपये प्रति लिटर
  9. नाशिकमध्ये पेट्रोल 106.43 रुपये आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
  10. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  11. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.91 आणि डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.70 आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.92 रुपये तर डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर आहे

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?