Fuel Price : दिवाळीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा बॉम्ब फुटणार का? काय आहे अपडेट्स..

Fuel Price : दिवाळीच्या तोंडावर तुम्हाला पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सामोरं जावे लागणार का?...

Fuel Price : दिवाळीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा बॉम्ब फुटणार का? काय आहे अपडेट्स..
दरवाढ होईल का?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 5:15 PM

नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. सध्या दोन राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यातील एका राज्यातील निवडणुकीचा बिगूल वाजलेला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्चा तेलाचे (Crude Oil) दर सातत्याने कमी-अधिक होत आहे. पण ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर भाव वाढीची शक्यता आहे का?..

सरकारने तेल कंपन्यांना (Oil Companies) दिवाळीच्या तोंडावर मदतीचा भरीव हात दिला आहे. सरकारने आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे कंपन्यांचा तोटा भरून निघण्यास मोठी मदत झाली आहे.त्यामुळे ऐन दिवाळीपूर्वी इंधन दरवाढ होण्याची शक्यता नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलच्या किंमती (Crude Oil Price) पुन्हा खाली उतरल्या आहेत. त्याचा फायदा तेल कंपन्यांना होत आहे. यापूर्वी कमी किंमतींनी कच्चे तेल खरेदी केल्याने सध्या बाजारात आहे त्या दराने इंधन विक्री करुन कंपन्या फायदा कमवत आहेत.

हे सुद्धा वाचा

18 ऑक्टोबर रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर झाले आहे. कोलकत्त्यात पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत आज पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

तुम्ही एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि तुमचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवून दर जाणून घेऊ शकतात.

तर HPCL ग्राहक HP Price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवल्यानंतर त्यांना ताजे दर एसएमएसद्वारे मिळतील. सकाळी 6 वाजेनंतर एसएमएस केल्यास तुम्हाला ताजे दर समजतील.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.