AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today’s petrol, diesel rates: गेल्या महिन्याभरापासून इंधनाचे दर स्थिर; आज काय स्थिती? जाणून घ्या पेट्रोल, डिझेलचे नवे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत, नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

Today's petrol, diesel rates: गेल्या महिन्याभरापासून इंधनाचे दर स्थिर; आज काय स्थिती? जाणून घ्या पेट्रोल, डिझेलचे नवे दर
पेट्रोल डिझेलचे दर Image Credit source: tv9
| Updated on: May 10, 2022 | 6:47 AM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil price) तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर हे 113 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाचे दर वाढत असून देखील देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आज पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल (petrol), डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलचे दर लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक वाढल्याचे पहायला मिळाले. मात्र सहा एप्रिलनंतर इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105. 41 रुपये तर डिझेलचा भाव प्रति लिटर 96.67 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 115.12 आणि 99.83 रुपये प्रति लिटर आहे.

राज्यातील प्रमुख शहराती भाव

  1. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या राज्यात सर्वात महाग पेट्रोल हे परभणीमध्ये मिळत असून, परभणीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 106 रुपये इतका आहे.
  2. औरंगाबादमध्ये पेट्रोल, डिझेलचा भाव अनुक्रमे 121.30 आणि 104. 50 रुपये प्रति लिटर इतका आहे.
  3. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.20 तर डिझेलचा दर 103.10 रुपये आहे.
  4. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.40 आहे, तर एक लिटर डिझेलसाठी 103.73 रुपये मोजावे लागत आहेत.
  5. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये आहे.

Follow Us