AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे जर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Today Petrol, Diesel Rate देशातील प्रमुख कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव.

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे जर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोल, डिझेल दरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 29, 2022 | 8:39 AM
Share

नवी दिल्ली : देशातील प्रमुख कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol, Diesel Rate) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. गेल्या 22 मे पासून पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याची घोषणा केली होती. एक्साईज ड्यूटीमध्ये कपात झाल्याने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर साडेनऊ रुपये तर डिझेलच्या दरात सहा रुपयांची घसरण झाली. नवे दर 22 मे पासून लागू झाले. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात चढउतार सुरूच आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने त्याचा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे.

प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 96.72 रुपये लिटर आहे. तर डिझेलचा भाव प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.10 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 तर डिझेलचा दर 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. देशाच्या प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे मुंबईमध्ये तर सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल दिल्लीमध्ये आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

दररोज जारी होतात पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले तर पेट्रोल, डिझेलच्या किमती देखील वाढतात. आणि कच्च्या तेलाचे दर कमी झाले तर पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतात. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर जारी करण्यात येतात.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?