PF खात्याचे संपले हे टेन्शन; नोकरी बदलली तर आपोआप होईल खाते Transfer

EPFO PF Merger : आर्थिक वर्ष 2024-25 सुरु होऊन आता 12 दिवस उलटून गेले आहेत. तर ईपीएफओच्या एका नवीन नियमाला सुद्धा इतकेच दिवस झाले आहेत. या नियमामुळे देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ वाचली आहे. त्यांची ससेहोलपट थांबली आहे. काय आहे हा नियम, कसा झाला कर्मचाऱ्यांना फायदा?

PF खात्याचे संपले हे टेन्शन; नोकरी बदलली तर आपोआप होईल खाते Transfer
ईपीएफओचा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 9:25 AM

देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कार्यालयाने मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओ कार्यप्रणालीत मोठा बदल करत आहे. त्यात पीएफ संदर्भातील एक नियम बदलल्याने त्याचा कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. एका फटक्यात EPFO ने कर्मचाऱ्यांचा मनस्ताप संपवला आहे. त्यांची धावपळ, ससेहोलपट थांबवली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव आणि ऑनलाईन प्रक्रियेच्या संकटातून ईपीएफओने त्यांची सुटका केली आहे. त्यात जे कर्मचारी पगारवाढीसाठी अथवा नवीन करिअरच्या संधीसाठी तीन ते चार वर्षांत नोकरी बदलतात, त्यांना तर मोठा फायदा झाला आहे. काय आहे हा नवीन नियम, काय झाला त्याचा फायदा?

1 एप्रिलपासून नियमात हा बदल

या 1 एप्रिलपासून ईपीएफओने कर्मचाऱ्यांना मोठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. PF ट्रान्सफर करण्याची झंझट संपली आहे. कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर त्याचा पीएफ दुसऱ्या कंपनीसोबत विलीन (Merger) करण्याची प्रक्रिया वेळू खाऊ आणि मनस्ताप देणारी होती. नवीन नियमाने ही झंझटच संपवली. पीएफ हस्तांतरीत करण्यासाठी कर्मचाऱ्याला फॉर्म क्रमांक 31 भरण्याची गरज नाही. कर्मचाऱ्याने नोकरी बदलताच पीएफ आपोआप हस्तांतरीत, विलीन होणार आहे.

हे सुद्धा वाचा

आपोआप ट्रान्सफर होईल रक्कम

आता कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर त्याच्या ईपीएफ खात्यातील रक्कम आपोआप हस्तांतरीत होईल. कर्मचाऱ्यांना पगारातील 12 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा करावी लागते. तर नियोक्त्याला, कंपनीला पण तितकीच रक्कम त्याच्या खात्यात जमा करावी लागते. यापूर्वी नोकरी बदलली तर कर्मचाऱ्याला ईपीएफ रक्कम हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया करावी लागत होती.

या पद्धतीने तपासा बॅलन्स

अनेक सदस्यांना पासबुकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे. किती रक्कम काढता येते. खात्यासंबंधीची अपडेट कशी तपासावी याची माहिती नसते. त्यांना या तीन पद्धतीने खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती घेता येईल.

उमंग ॲपद्वारे तपासा बॅलन्स

स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करा. त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा. येथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.

मिस्ड कॉलद्वारे PF मधील शिल्लक जाणून घ्या

तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 अथवा 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

एसएमएसद्वारे जाणून घ्या रक्कम

पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.