AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PhonePe टर्म लाईफ इन्शुरन्स लाँच, 149 रुपयात लाखोंचा फायदा, तुम्ही पात्र आहात?

भारतातील लोकप्रिय डिजीटल पेमेंट्स अ‌ॅप फोन पे आता टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन घेऊन येत आहे. (Phone Pe Term Plan)

PhonePe टर्म लाईफ इन्शुरन्स लाँच, 149 रुपयात लाखोंचा फायदा, तुम्ही पात्र आहात?
फोन पे
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jan 07, 2021 | 11:15 AM
Share

नवी दिल्ली: भारतातील लोकप्रिय डिजीटल पेमेंट्स अ‌ॅप फोन पे आता टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन घेऊन येत आहे. फोन पे ने यासाठी आयसीआयसीआय प्रोड्युन्शिअल लाईफ इन्शुरन्स सोबत करार केला आहे. दोन्ही कंपन्यानी एकत्र येत नवीन टर्म इन्शुरन्स प्लॅन जाहीर केला आहे. यामुळे फोन पेच्या लाखो युजर्सना याचा फायदा होणार आहे. फोन पेकडून जारी करण्यात आलेल्या टर्म प्लॅनचा प्रीमियमची रक्कम वार्षिक 149 रुपयांपासून सुरु होते. हा टर्म प्लॅन खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आरोग्य चाचणी किंवा कागदपत्रांची तपासणी करावी लागणार नाही. फोन पेच्या अ‌ॅपवर हा टर्म प्लॅन खरेदी करता येईल. (Phone Pe launches term plans starting one hundred fifty nine rupees know about plan)

फोन पे ग्राहकांना या टर्म प्लॅनमध्ये 1 लाख ते 20 लाख रुपयांपर्यतच्या रक्कमेसाठी प्रीमियम निवडता येईल. त्यानुसार प्रीमियमची रक्कम बदलेल. 149 रुपयांमध्ये टर्म इन्शुरन्स प्लॅन उपलब्ध झाल्यामुळे फोन पेच्या लाखो वापरकर्त्यांना याचा लाभ घेता येईल. हा एक टर्म इन्शुरन्स प्लॅन असून मॅच्युरिटीनंतर पॉलिसीधारकाला कोणतीही रक्कम मिळणार नाही. पॉलिसीच्या कालावधीमध्ये विमा घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना(वारसदारांना) विमा रक्कम दिली जाणार आहे.

टर्म इन्शुरन्स कोण घेऊ शकते?

फोन पे अ‌ॅप वापरणारा कोणीही 18 ते 50 वर्ष वयापर्यंतची व्यक्ती ज्याचं उत्पन्न 1 लाखांहून अधिक असेल तो या प्लॅनचा लाभ घेऊ शकतो. हा प्लॅन फोन पे अ‌ॅपच्या इन्शुरन्स ऑप्शनमध्ये जाऊन खेरदी करता येईल. टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये ग्राहकाला 1 लाखांपासून 20 लाखांपर्यतच्या रक्कमच्या प्रमाणात प्रीमियम भरावा लागेल.

फोन पेचा वापर करणाऱ्या 1 कोटी 10 लाख वापरकर्त्यांनी 2020 मध्ये विम्याचे हप्ते भरले होते. फोन पेसोबत सध्या 30 विमा कंपन्या जोडलेल्या आहेत. या कंपन्यांच्या विम्याचे हप्ते फोन पेवरुन भरले जातात.

टर्म इन्शुरन्स प्लॅन कसा खरेदी करणार

फोन पे अ‌ॅप वापरणाऱ्यांना त्यांच्या अ‌ॅपमधून हा टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करता येईल. एपमध्ये फोन पे वरील ‘My Money’ सेक्शनवर जावं लागेल. त्यानंतर Insurance वर क्लिक करावं लागेल. यानंतर Term Life Insurance ची निवड करणं आवश्यक आहे. यानंतर विमाधारक व्यक्ती आणि वारसदाराची माहिती भरावी लागेल. त्यानंतर युजर्स ऑनलाईन पेमेंटद्वारे ही पॉलिसी खरेदी करु शकतात. प्लॅन खरेदी करण्यापूर्वी कंपनीनं दिलेल्या अटी शर्थी काळजीपूर्वक वाचाव्यात किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या:

नव्या वर्षात स्वस्तात खरेदी करा स्वप्नातलं घर, PNB तब्बल 3100 घरांचा करतेय लिलाव

लखपती व्हायचंय… मग मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा

(Phone Pe launches term plans starting one hundred fifty nine rupees know about plan)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली