AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या बड्या 2 बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना खास गिफ्ट, आता 31 मार्चपर्यंत करू शकता गुंतवणूक

31 डिसेंबर 2020 ही या योजनेची अंतिम तारीख होती. पण कोरोनाच्या भीषण काळात एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने ही मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली आहे.

देशाच्या बड्या 2 बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना खास गिफ्ट, आता 31 मार्चपर्यंत करू शकता गुंतवणूक
| Edited By: | Updated on: Jan 04, 2021 | 11:09 PM
Share

नवी दिल्ली : देशातील दोन मोठ्या खासगी बँकांनी नवीन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) खास ऑफर आणली आहे. एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) ज्येष्ठ नागरिकांना विशेष मुदत ठेव योजनेत (Special Fixed Deposit Scheme) गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. तर मे महिन्यामध्ये या दोन्ही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना जाहीर केली होती. 31 डिसेंबर 2020 ही या योजनेची अंतिम तारीख होती. पण कोरोनाच्या भीषण काळात एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने ही मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. (hdfc bank icici bank extended senior citizens special fd scheme till 31 march 2021)

एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज देणारी योजना 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असणार आहे. इतकंच नाही तर योजनेतील जास्तीत जास्त ठेव रक्कम 2 कोटींपेक्षा कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसबीआय व्हीकेअर ठेवींमध्ये, मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढताना अतिरिक्त व्याज दिलं जात नाही.

HDFC बँकेची विशेष एफडी योजना

एचडीएफसी बँकेने एचडीएफसी सीनियर सिटीझन केअर ही खास एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मे महिन्यामध्ये सुरू केली होती. या ठेवींवर बँक 0.75 टक्के जास्त व्याज दर देतं. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर (HDFC Senior Citizen Care) एफडी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकाने ठेव निश्चित केल्यास एफडीला लागू असलेला व्याज दर 6.25 टक्के असेल. 13 नोव्हेंबरपासून हे दर लागू करण्यात आले आहेत.

ICICI बँकेची विशेष एफडी योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बँकेने आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स (ICICI Bank Golden Years) योजनांसाठी एक खास एफडी योजना सुरू केली. या योजनेत बँक 0.80 टक्के अधिक व्याज देतं. आयसीआयसीआय बँक गोल्डन ईयर एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30% व्याज दर देत आहे. हे दर 21 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत. (hdfc bank icici bank extended senior citizens special fd scheme till 31 march 2021)

संबंधित बातम्या – 

Bank of Baroda च्या खातेदारांसाठी गुडन्यूज, व्हॉट्सअ‌ॅप बँकिंग सर्व्हिस सुरु

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी 2000 रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा भाव

10 वर्षांपर्यंत मोदी सरकार देणार पेन्शन; ‘या’ योजनेचा कसा घ्याल फायदा?

(hdfc bank icici bank extended senior citizens special fd scheme till 31 march 2021)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.