Bank of Baroda च्या खातेदारांसाठी गुडन्यूज, व्हॉट्सअ‌ॅप बँकिंग सर्व्हिस सुरु

Bank of Baroda ने आपल्या खातेदारांना नववर्षात गुडन्यूज दिली आहे. बँकेने व्हॉट्सअ‌ॅप बँकिंग सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Bank of Baroda च्या खातेदारांसाठी गुडन्यूज, व्हॉट्सअ‌ॅप बँकिंग सर्व्हिस सुरु
Akshay Adhav

| Edited By: Team Veegam

Jan 16, 2021 | 3:54 PM

नवी दिल्ली : Bank of Baroda ने आपल्या खातेदारांना नववर्षात गुडन्यूज दिली आहे. बँकेने व्हॉट्सअ‌ॅप बँकिंग सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातल्या सरकारी बँकेपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या व्हॉट्सअ‌ॅप बँकिंग सर्व्हिसचा अनेक ग्राहकांना फायदा होणार आहे. (Bank of baroda Whatsapp banking Service Available For Customer Of Bank)

खातेदार आता व्हॉट्सअप सर्व्हिसद्वारे बँकेतील शिल्लक रक्कम तसेच चेकची सद्यस्थिती घरबसल्या मोबाईलवरुन जाणून घेऊ शकतात. त्याचबरोबर पाठीमागच्या काही दिवसांताली मिनी स्टेटमेंटही घेऊ शकतात. याशिवाय चेकबुकसाठी बँकेकडे ऑनलाईन रिक्वेस्टही पाठवू शकतात.

बँक नियमाच्या अनुसार, सर्वांत पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये 8433 888 777 हा नंबर सेव्ह करावा लागेल. या व्हॉट्सअॅप नंबरवर इंग्रजी अक्षरात HI मेसेज करावा लागेल. या नंबरवर व्हॉट्सअ‌ॅप द्वारे बँकेच्या सेवा महिन्याच्या सगळ्या दिवशी अगदी चोवीस तास उपलब्ध असतील, असं बँकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

“बँकेच्या खातेदारांना सर्वोत्तम सुविधा देण्यास बँक कटिबद्ध आहे. बँकेच्या व्हॉट्सअ‌ॅप सर्व्हिसचा बँकेच्या अनेक खातेदारांना फायदा होणार आहे. या आणि अशाचप्रकारच्या सुविधा खातेदारांना देण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्न करेल”, असं बँकेचे एक्झिकेटिव्ह डायरेक्टर ए.के.खुराना यांनी सांगितलं.

“सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे बँकेने ग्राहकांना चांगल्या ऑनलाईन सुविधा देण्याचं ठरवलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या बँकिंग गरजा घरातूनच पूर्ण करता येतील”, असंही ए.के.खुराना यांनी सांगितलं. (Bank of baroda Whatsapp banking Service Available For Customer Of Bank)

व्हॉट्सअ‌ॅप बँकिंगमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार…???

  • बॅलन्स इनक्वायरी (Balance Inquiry)
  • मिनी स्टेटमेंट (Mini Statement)
  • चेक स्टेटमेंट (Check Statement)
  • चेक बुक रिक्वेस्ट (Cheque Book request)

हे ही वाचा

SBI खातेदारांना मोठा दिलासा; आता ‘या’ सर्व सुविधा घरबसल्या मिळणार; पण फायदा कोणाला?

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी 2000 रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा भाव

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें