ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त विमान कंपन्यांची भरघोस ऑफर

मुंबई: विमानप्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. विमान कंपन्यांनी ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने विमानाच्या तिकीट दरात कपात केली आहे. ही कपात मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट असल्याचे सांगितलं जात आहे. ही सूट विशेष करुन यंदाच्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने हॉलिडेसाठी जाणाऱ्या प्रवाशांना दिली जात आहे. एअरलाईन कंपन्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तिकीट दर हा दुपटीच्या फरकाने कमी …

ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त विमान कंपन्यांची भरघोस ऑफर

मुंबई: विमानप्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. विमान कंपन्यांनी ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने विमानाच्या तिकीट दरात कपात केली आहे. ही कपात मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट असल्याचे सांगितलं जात आहे. ही सूट विशेष करुन यंदाच्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने हॉलिडेसाठी जाणाऱ्या प्रवाशांना दिली जात आहे. एअरलाईन कंपन्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तिकीट दर हा दुपटीच्या फरकाने कमी केला आहे. जर तुम्ही अॅडव्हान्स तिकीट  आताच बूक केलात ते खिशाला परवडेल अशा किंमतीत उपलब्ध होईल.

दरवर्षी ख्रिसमस आणि नव वर्षाच्या सेलिब्रेट करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी भारताबाहेर तसेच भारतातील वेग-वेगळ्या शहरात जात असतात. यासाठी एअरलाईन्स कंपन्यांनी यंदा मोठी सूट प्रवाशांना दिली आहे. गोव्याला मोठ्या प्रमाणात ख्रिसमस सण साजरा केला जातो. तसेच तेथे ख्रिसमस साजरा करणारा वर्गही मोठा आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिगोने दिल्ली ते गोवाच्या मार्गासाठी 7500 रुपयांचा तिकीट दर ठेवण्यात आला आहे.

नेहमी प्रवास करताना तारखेच्या काही दिवसांआधी जर आपण तिकीट बूक केलं तर त्याचे दर जास्त असतात. पण यावर्षी एअरलाईन कंपनीने प्रवाशांच्या गरजेला प्राधान्य देऊन तिकीट दरात घट करण्याचा निर्णय घेतला. तसेच मार्केटमध्ये मोठी स्पर्धा चालू आहे, अशा परिस्थितीतही कंपनीने तात्काळ काही कालवधीसाठी कंपनीचे तिकीट दर कमी केले आहेत.

प्रवासापूर्वी  22 ते 28 दिवसांच्या आधी बूक होणाऱ्या तिकीटांवर सूट देण्यात येणार आहे. तसेच यामधील सूट मागील वर्षाच्या तुलनेत आठ टक्क्यांनी आणखी घटवण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *