पोस्ट ऑफिस आता पॉकेटमध्ये! घरबसल्या मिळतील या सेवा, Dak Seva 2.0 वर नागरिक फिदा

Dak Seva 2.0 : भारतीय पोस्ट खात्याने नवीन डिजिटल ॲप 'Dak Seva 2.0' सुरु केले आहे. यामुळे नागरिकांना आता अनेक सुविधा घर बसल्या मिळतील. पोस्ट ऑफिस नागरिकांच्या खिशात आले आहे.

पोस्ट ऑफिस आता पॉकेटमध्ये! घरबसल्या मिळतील या सेवा, Dak Seva 2.0 वर नागरिक फिदा
पोस्ट ऑफिस पॉकेटमध्ये
| Updated on: Nov 13, 2025 | 2:48 PM

Post Office New App : भारतीय टपाल खात्याने देशभरातील युझर्ससाठी एक जबरदस्त पाऊल टाकले आहे. आता पोस्ट ऑफिसच्या अनेक सेवांसाठी रांगेत ताटकळत उभं राहण्याची गरज नाही. भारतीय टपाल खात्याने नवीन मोबाईल ॲप Dak Seva 2.0 सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोबाईलवरूनच मनी ऑर्डर, पार्सल ट्रॅकिंग, विम्याचा हप्ता भरणे आणि इतर सेवा सहज उपलब्ध होतील. ॲप वापरण्यास सोपं असल्याचा दावा या या खात्याने केला आहे. युझर्स फ्रेंडली प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना काही सेवांसाठी पोस्टात जाण्याची गरज नाही.

‘आता पॉकेटमध्ये पोस्ट ऑफिस’

टपाल खात्याच्या या ॲपची माहिती विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली आहे. आता पाकिटात मिळेल पोस्टाच्या सोयी-सुविधा आशा आशयाची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. म्हणजे पोस्टाच्या अनेक सेवा या तुमच्या बोटावर येतील. पार्सल पाठवणे असो वा विम्याचा हप्ता जमा करणे असो, स्पीड पोस्टाने एकूण किती खर्च लागले याची माहिती असो केवळ एका क्लिकवर ही माहिती मिळेल.

Dak Seva 2.0 मध्ये मिळतील या सुविधा

Dak Seva 2.0 हे ॲप पूर्णपणे युझर फ्रेंडली आहे. कोणतीही व्यक्ती ते सहज हाताळू शकते. या ॲपच्या मदतीने घर बसल्या नागरिकांना आता या सेवा उपलब्ध होतील.

पार्सल ट्रॅकिंग: कोणत्याही स्पीड पोस्ट वा पार्सलची डिलिव्हरीची अपडेट आणि ते केव्हा पोहचले याची माहिती मिळेल.

मनी ऑर्डर: गावाकडे, आई-वडिलांसाठी मनी ऑर्डर करायची असेल तर पोस्टात जाण्याची गरज नाही. मोबाईलवरूनच तो मनी ऑर्डर पाठवू शकतो.

पोस्टल फी कॅलक्युलेटर: स्पीड पोस्ट, रजिस्ट्री वा इतर सेवांचे शुल्क किती आकारले जाते याची माहिती युझर्सला मिळेल.

PLI/RPLI पेमेंट: पोस्टल लाईफ इन्शुरन्सचा हप्ता सुद्धा या ॲपच्या मदतीने भरता येईल.

तक्रार करणे झाले सोपे

टपाल खात्याच्या सेवेबद्दल काही तक्रार असेल तर त्यासाठी ॲपमध्ये Complaint Management System देण्यात आली आहे. युझर्स हे त्यांची तक्रार तिथे नोंदवू शकता. तर याच ॲपमध्ये या तक्रारीवर काय कारवाई सुरू आहे याची सध्यस्थिती त्यांना पाहता येणार आहे. ही सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने नियंत्रित होईल.

23 भारतीय भाषांमध्ये ॲपचा पर्याय

टपाल खात्याचे ॲप हे भारतातील विविध भाषांमध्ये वापरता येणार आहे. हे ॲप देशातील 23 भारतीय भाषांमध्ये असेल. यामध्ये हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, तामिळ, गुजराती आणि इतर भाषांचा समावेश आहे. भाषा बदलण्याचा पर्याय या ॲपच्या सर्वात टॉपवर देण्यात आला आहे. हे ॲप नागरिकांना वापरण्यास सोपं आहे.