AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jan Dhan Account : तब्बल 6 कोटी जनधन अकाऊंट निष्क्रिय, तुमचं खातंही चेक करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रधानमंत्री जनधन योजनेनुसार (Pradhan Mantri Jan Dhan Yojana PMJDY) देशातील नागरिकांची बँकांमध्ये जन धन खाती (Jan Dhan Account) उघडण्यात आली.

Jan Dhan Account : तब्बल 6 कोटी जनधन अकाऊंट निष्क्रिय, तुमचं खातंही चेक करा!
Jan Dhan Account
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 12, 2021 | 12:07 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रधानमंत्री जनधन योजनेनुसार (Pradhan Mantri Jan Dhan Yojana PMJDY) देशातील नागरिकांची बँकांमध्ये जन धन खाती (Jan Dhan Account) उघडण्यात आली. बँक सुविधापासून वंचित असलेल्यांना प्राधान्याने ही खाती उघडून देण्यात आली. मात्र आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी तब्बल 5.82 कोटी खाती निष्क्रिय आहेत. महत्त्वाचं म्हणजे यापैकी 2.02 कोटी खाती ही महिलांची आहेत. या खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार न झाल्याने निष्क्रिय खात्यांची संख्या मोठी आहे.

देशाचे नवे अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. निष्क्रिय खात्यांची संख्या 5.82 कोटी इतकी आहे. निष्क्रिय खात्यांच्या संख्येची टक्केवारी मार्च 2020 मध्ये 18.08 होती, तर जुलै 2021 मध्ये त्यामध्ये घट होऊन ती टक्केवारी 14.02 टक्क्यांवर पोहोचली.

खाते निष्क्रिय कधी होते?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, जर एखाद्या खात्यात सलग दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक दिवस कोणताही जमा-खर्चाचा व्यवहार झाला नाही तर ते खाते इनऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय होतं. म्हणजे 5.82 कोटी जन धन खाती अशी आहेत, ज्यामध्ये दोन वर्षांपासून कोणतेच व्यवहार झालेले नाहीत. हा चिंतेचा विषय यासाठी आहे की ज्या गरिबांच्या कल्याणासाठी अशी खाती उघडण्यात आली, त्यांच्या खात्यात सरकारकडून विविध योजनांचे पैसे, ग्रामीण रोजगार हमीचे पैसे पाठवले जातात.

जुनं सेव्हिंग खातं जनधन खात्यात बदला

तुमचं जुनं सेव्हिंग खातं असेल तर ते जनधन खात्यात रुपांतरित करता येतं. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. तसंच आपल्या खात्याच्या RuPay कार्डसाठी अर्ज करावा लागेल. वैध अर्ज भरुन तुमचं खातं जनधन खात्यात बदललं जाऊ शकतं.

आधार कार्डद्वारे निष्क्रिय खाते सक्रिय करा

तुम्ही आधार कार्डद्वारे जनधन अकाऊंट सुरु करु शकता. जर या खात्यात कोणताही व्यवहार झाला नाही तर ते बंद होऊ शकतं. मात्र पुन्हा ते सुरु करण्यासाठी तुम्हाला या खात्यात व्यवहार सुरु ठेवावा लागेल.

संबंधित बातम्या 

कधी काळी खिशात 25 पैसे नव्हते, आज 500 कोटींचे मालक, कोण आहेत सांगलीचे अशोक खाडे?

ग्रामपंचायत किंवा सरपंचाच्या स्वाक्षरीमधील दस्तावेजातील पत्ता आधारनुसार बदलता येतो का? जाणून घ्या

Follow Us
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ