अर्थचक्रासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा उपाय, केंद्राला अधिकच्या नोटा छापण्याचा सल्ला

| Updated on: Apr 28, 2020 | 1:56 PM

आर्थिक गाडा हाकण्यासाठी मिळेल तेवढं कर्ज घ्यावे लागेल, असंही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan Solution for Corona Economic cycle) म्हणाले.

अर्थचक्रासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा उपाय, केंद्राला अधिकच्या नोटा छापण्याचा सल्ला
Follow us on

मुंबई : लॉकडाऊननंतर आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारला (Prithviraj Chavan Solution for Corona Economic cycle) अधिकच्या नोटा छापाव्या लागतील, असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. युवक काँग्रेसच्या वेब सेमिनारमध्ये बोलताना त्यांनी अर्थव्यवस्थेबाबतचं भाष्य केलं.

आर्थिक गाडा हाकण्यासाठी मिळेल तेवढं कर्ज घ्यावे लागेल, असंही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan Solution for Corona Economic cycle) म्हणाले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनाही सल्ला दिला. मिळेल तेवढं कर्ज काढा, तसंच केंद्राकडून मदत मिळवा, अशा सूचना त्यांनी अजित पवारांना केल्या.

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. कारण राज्याचे जे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत, RTO रजिस्ट्रेशनमधून पैसे मिळतात, स्टॅम्प ड्युटीतून मिळतात, एक्साईजमधून मिळतात, हे सगळे उत्पन्नाचे स्त्रोत आटले आहेत. एक्साईजमधून डिझेल-पेट्रोलमधून जो पैसा मिळतो, तोही कमी झाला आहे. ज्यामुळे सरकारचे जे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत, तो केंद्राच्या जीएसटीमधून जो वाटा मिळतो, तो वाटा मिळेल तेवढ्यावरच पुढच्या उत्पन्नाचं स्त्रोत राहिलेलं आहे. तो वाटाही संकुचित झाला आहे.

त्यात सुद्दा केंद्राचा जवळजवळ 15 हजार कोटीचा वाटा, हक्काचे जे 15 हजार कोटी आहेत ते दिलेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारची परिस्थिती फारच बिकट आहे. म्हणूनच राज्य सरकारला कामगारांचे पगार थांबवण्याचा, आमदारांचे पगार कपात करण्याचा, मंत्र्यांचे पगार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यातून काहीही होणार नाही. आपल्याला फार मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज काढावं लागतील.

अर्थमंत्र्यांना सल्ला आहे की, या अडचणीच्या प्रसंगी मिळेल तेवढं कर्ज काढावं लागेल. केंद्र सरकारकडून मिळेल, तेवढं कर्ज काढावं लागेल आणि शेवटी केंद्राला नोटा छापाव्या लागतील. या परिस्थितीत मला अजून यावाचून दुसरा काहीही पर्याय दिसत नाही.

म्हणून मी स्पष्टपणे सांगतो, जे घटक आहेत त्यांना आपल्याला मदत करावी लागेल. त्या घटकांना मदत केलीच पाहिजे. त्याकरिता आपल्याला कर्ज काढावे लागले. उद्या उद्या येईल, पण आज आजचा आहे. आजचं संकट कस सोडवायचं, आजची उपासमार कशी सोडवायची, याबद्दल आपल्याला काही ठोस पावलं टाकावी लागतील.

मला अजूनही केंद्र सरकारने जे पॅकेज किंवा जी प्रोत्साहानात्मक मदत जाहीर केली आहे, ती अजूनही तुटपुंजी वाटते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

राज्यपालांना मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत राजकारण होत आहे, यात काही शंका नाही. कारण भारतीय राज्यघटनेप्रमाणे एकदा मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं की मग, मंत्रिमंडळाचा अधिकार हा सर्वोच्च असतो. राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यांनीच राज्य करायचं असतं किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला मान्य करावा लागतो, असे पृथ्वीराज  चव्हाण यांनी (Prithviraj Chavan Solution for Corona Economic cycle) सांगितले .

मंत्रिमंडळ गठण व्हायच्या आत कोणाला मुख्यमंत्री करायचं, यात राज्यपालांकडे भरपूर स्वेच्छाधिकार असतात. त्यांनी तो यावेळी वापरला आहे. जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे 80 तासांचे सरकार झाले. पण उद्धव ठाकरेंचे सरकार अस्तित्वात आलं आहे. ते विधीवत स्थापन झालं आहे. त्यामुळे त्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला किंवा शिफारश असेल ती राज्यपालांना मान्यच करावी लागते, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

संबंधित बातम्या : 

RBI PC | कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी RBI ने पेटारा उघडला, नाबार्ड, लघु उद्योगांसाठी 50 हजार कोटी

कोरोनाचा मुकेश अंबानींना सर्वात मोठा फटका, दोन महिन्यात 1.3 लाख कोटींचं नुकसान

सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन महिन्यांची स्थगिती द्या, RBI चा बँकांना सल्ला