सार्वजनिक क्षेत्राचा उदय : नव्या भारताच्या विकासयात्रेत NALCO आणि HCL चमकले

या यशाचा अर्थ आहे – आत्मनिर्भर, सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक भारत. हे धोरणाधारित शासन, धोरणात्मक सुधारणा आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये आलेली उत्तरदायित्व आणि नवकल्पनांची भावना याचे प्रत्यक्ष फलित आहे.

सार्वजनिक क्षेत्राचा उदय : नव्या भारताच्या विकासयात्रेत NALCO आणि HCL चमकले
g kishan reddy
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 28, 2025 | 6:57 PM

एकेकाळी अकार्यक्षम, तोट्यात चालणारे आणि पांढरा हत्ती म्हणून हेटाळणी करण्यात आलेल्या सार्वजनिक क्षेत्राला आता सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक सकारात्मक बदल घडवून सार्वजनिक क्षेत्राचा नव्याने उदय घडवून आणला आहे. हा इतका मोठा बदल झालाय की सार्वजनिक क्षेत्र आता भारताच्या आर्थिक विकासाचे आणि आत्मनिर्भरतेचे बळकट इंजिन बनले आहे. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी एक पोस्ट शेअर करून सार्वजनिक क्षेत्राची भरारी अधोरेखित केली आहे.

गेल्या 10 वर्षांत लोकांचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवरचा विश्वास वाढला आहे आणि त्यांचा कार्यक्षमतेतही मोठी वाढ झाली आहे, असं पंतप्रधानांनी मागील वर्षी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावरील उत्तरात म्हटले होते. हे फक्त शब्द नाहीत — आकडेवारी हे सिद्ध करते. 2014 पासून सुरु झालेल्या विकासाच्या या प्रवासात PSUs चा एकत्रित निव्वळ संपत्ती 9.5 लाख कोटींवरून वाढून आता17 लाख कोटींपेक्षा जास्त झाली आहे. या घटकांनी भारताच्या राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असं केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

उच्च आर्थिक कामगिरीचा टप्पा गाठला

नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) ने आपल्या स्थापनेपासूनचा सर्वात उच्च आर्थिक कामगिरीचा टप्पा गाठला असून ही कामगिरी भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये आलेल्या नव्या ऊर्जा आणि उद्दिष्टाचे प्रतीक आहे. याच धर्तीवर, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) नेही आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये स्थापनेपासूनचा सर्वात उच्च निव्वळ नफा नोंदविला आहे. ही कामगिरी भारताच्या खनिज आणि धातू क्षेत्रातील PSUs च्या नवसंजीवनीची साक्ष देते, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भारताचे भवितव्य उज्ज्वल

या यशाचा अर्थ आहे – आत्मनिर्भर, सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक भारत. हे धोरणाधारित शासन, धोरणात्मक सुधारणा आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये आलेली उत्तरदायित्व आणि नवकल्पनांची भावना याचे प्रत्यक्ष फलित आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाखाली, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना नवसंजीवनी मिळाली आहे. आज हे उपक्रम तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि ध्येयात्मकतेने सज्ज होऊन देशाच्या ‘विकसित भारत 2047’ या लक्ष्याच्या दिशेने मार्गदर्शक बनले आहेत. NALCO आणि HCL च्या चमूंना त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी व उत्कृष्टतेप्रती असलेल्या निष्ठेसाठी हार्दिक अभिनंदन! अशा तेजस्वी संस्थांच्या नेतृत्वामुळे भारताचे भविष्य अधिक उज्ज्वल दिसते, असंही रेड्डी यांनी म्हटलं आहे.