रेल्वेचे एसी भाडे पूर्वीपेक्षा स्वस्त होणार, रेल्वेने ‘या’ गाड्यांमध्ये 3 टियर इकॉनॉमी डबे बसवले, यादी पाहा

11 अतिरिक्त प्रवासी नवीन डब्यात प्रवास करू शकतील. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन अनेक आधुनिक व्यवस्था करण्यात आल्यात. प्रवाशांना मोबाईल फोन आणि मॅगझिन धारक मिळतील आणि अग्निसुरक्षेचीही पूर्ण व्यवस्था करण्यात आलीय. प्रत्येक बर्थ समोर पर्सनलाइज्ड रीडिंग दिवे लावण्यात आलेत, जेणेकरून प्रवाशांना वाचायचे असेल तर फक्त त्याला प्रकाश मिळेल, बाकीच्या प्रवाशांच्या झोपेत अडथळा येणार नाही. एसी व्हेंट, यूएसबी पॉइंट, मोबाईल चार्जिंग पॉइंट प्रत्येक सीटवर देण्यात आलेत.

रेल्वेचे एसी भाडे पूर्वीपेक्षा स्वस्त होणार, रेल्वेने 'या' गाड्यांमध्ये 3 टियर इकॉनॉमी डबे बसवले, यादी पाहा
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 5:07 PM

नवी दिल्लीः सणांचा हंगाम पाहता भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. रेल्वेच्या या निर्णयामुळे ट्रेनमधील एसी कोचचे भाडे पूर्वीपेक्षा स्वस्त होणार आहे. प्रवाशांना एसीच्या प्रवासाचा स्वस्तात आनंद घेता यावा, यासाठी रेल्वेने अनेक गाड्यांमध्ये 3 टियर इकॉनॉमी डबे बसवण्याचा निर्णय घेतलाय. या डब्यांमध्ये प्रवास करण्यासाठी कमी भाडे द्यावे लागेल. लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांमध्ये नवीन एसी डबे जोडण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. उत्तर रेल्वेने आपल्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांमध्ये हा विशेष प्रकारचा एसी बोगी जोडण्याची घोषणा केली. ताज्या अपडेटनुसार, 83 प्रवासी नवीन प्रकारच्या एसी कोचमध्ये प्रवास करू शकतील, तर पूर्वीच्या डब्यात 72 प्रवाशांची जागा होती. या बोगीचे दोन फायदे होतील असे रेल्वेने म्हटले आहे. एकीकडे अधिक प्रवाशांना प्रवासाचा लाभ मिळेल, ज्यामुळे रेल्वेची कमाई देखील वाढेल. दुसरा फायदा प्रवाशांना होईल कारण या डब्यात एसी भाडे आधीच्या डब्यापेक्षा कमी असेल.

ही सुविधा उपलब्ध असेल

11 अतिरिक्त प्रवासी नवीन डब्यात प्रवास करू शकतील. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन अनेक आधुनिक व्यवस्था करण्यात आल्यात. प्रवाशांना मोबाईल फोन आणि मॅगझिन धारक मिळतील आणि अग्निसुरक्षेचीही पूर्ण व्यवस्था करण्यात आलीय. प्रत्येक बर्थ समोर पर्सनलाइज्ड रीडिंग दिवे लावण्यात आलेत, जेणेकरून प्रवाशांना वाचायचे असेल तर फक्त त्याला प्रकाश मिळेल, बाकीच्या प्रवाशांच्या झोपेत अडथळा येणार नाही. एसी व्हेंट, यूएसबी पॉइंट, मोबाईल चार्जिंग पॉइंट प्रत्येक सीटवर देण्यात आलेत.

या गाड्यांना स्वस्त एसी कोच असतील

गोरखपूर-कोचुवेली एक्सप्रेस गोरखपूर-सिकंदराबाद एक्सप्रेस गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेस लोकमान्य टिळक (टर्मिनस) -गोरखपूर एक्सप्रेस लोकमान्य टिळक (टी)-वाराणसी एक्सप्रेस लोकमान्य टिळक (T) – छपरा एक्सप्रेस लोकमान्य टिळक (टी) – फैजाबाद एक्सप्रेस

नवीन इकॉनॉमी कोचची वैशिष्ट्ये

या नवीन डब्यांमध्ये 72 ऐवजी 83 प्रवाशांना बसण्याची सोय असेल. म्हणजेच आधीच्या बोगींपेक्षा 11 अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. या सर्व डब्यांची रचना दिव्यांगजनांची सोय लक्षात घेऊन करण्यात आलीय. मोबाईल फोन, मासिक धारक आणि अग्निसुरक्षा यासंबंधी अनेक आधुनिक व्यवस्था करण्यात आल्यात. आधुनिक 3 स्तरीय इकॉनॉमी क्लास एसी कोच गाड्यांमध्ये जोडले जातायत, जे 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकतात. हे डबे अशा प्रकारे बांधण्यात आले आहेत की, प्रवाशांना बसताना किंवा झोपताना आराम मिळेल. बर्थला मॉड्युलर डिझाईन देण्यात आले, वरच्या बर्थवर चढण्यासाठी खास डिझाइन केलेली शिडी लावण्यात आली, जेणेकरून इतर प्रवाशांना त्रास होणार नाही डब्यात प्रवासी माहिती प्रणाली बसवण्यात आली आहे जी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे आणि त्यावर संपूर्ण प्रवासाची माहिती उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या

मोठी बातमी! LIC पुढील महिन्यात सेबीला IPO ड्राफ्ट पेपर सादर करणार

येत्या 3-4 वर्षांत सेन्सेक्स 1 लाखाचा टप्पा ओलांडणार, ‘या’ कंपन्यांत गुंतवणूक करा अन् व्हाल मालामाल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.