Ratan Tata : रतन टाटा यांचे हृदय द्रवले, पावसाळ्यात ही काळजी घेण्याचे केले आवाहन

Ratan Tata : रतन टाटा यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आतापर्यंत समोर आले आहेत. ते हळव्या स्वभावाचे आणि नम्र व्यक्ती म्हणू सुपरिचित आहेत. त्यांनी पावसाळ्यात ही काळजी घेण्याचे सर्वांनाच आवाहन केले आहे. याविषयी त्यांचे ट्विट अनेकांना भावत आहे.

Ratan Tata : रतन टाटा यांचे हृदय द्रवले, पावसाळ्यात ही काळजी घेण्याचे केले आवाहन
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 10:21 AM

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : देशात उत्तर भारताला पावसाने (Monsoon) झोडपून काढले आहे. पावसाने उत्तर भारतीयांच्या नाकात दम आणला आहे. सूर्य दर्शनाची आस या भागातील लोकांना लागली आहे. उर्वरीत भारतात पावसाने अजून दमदार हजेरी लावली नसली तरी ढगांची घोंगडी टाकली आहे. पण या वातावरणामुळे उद्योगपती रतन टाटा काळजीत पडले आहेत. भारतातील सर्वात जुन्या उद्योग समूहांपैकी टाटा समूहाचे (Tata Group) पूर्व संचालक आणि अब्जाधीश रतन टाटा (Ratan Tata) यांनी त्यांच्या चिंतेचे कारण ही सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. तन टाटा यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आतापर्यंत समोर आले आहेत. ते हळव्या स्वभावाचे आणि नम्र व्यक्ती म्हणू सुपरिचित आहेत. त्यांनी पावसाळ्यात ही काळजी घेण्याचे सर्वांनाच आवाहन केले आहे. याविषयी त्यांचे ट्विट अनेकांना भावत आहे.

भटक्या जनावरांसाठी द्रवले हृदय

हे सुद्धा वाचा

रतन टाटा हे प्राणी प्रेमी आहेत. कुत्रा हा त्यांचा लाडका प्राणी आहे. मॉन्सूनमध्ये आपण तरी आसारा शोधतो, पण मुक्या जनावरांना प्रत्येक वेळी आसारा भेटेलच हे सांगता येत नाही. त्यात भटक्या प्राण्यांची अवस्था तर अत्यंत केविलवाणी होते. त्यांना भर पावसात एखाद्या मोठ्या वाहनाचा अडोसा शोधावा लागतो. काही प्राणी ट्रकखाली, चारचाकी खाली आसरा शोधतात

पण तुम्ही काळजी घेता का?

पावसात प्राणी एखाद्या वाहनाच्या खाली आसरा शोधतात. ते वाहनाच्या अडोशाला अथवा वाहनाखाली बसतात. यामध्ये मांजरी, कुत्रे, गायी, बैल, इतर प्राण्यांचा समावेश असतो. पण अनेकदा वाहन चालक या बाबीकडे दुर्लक्ष करतो. तो वाहनाच्या खाली कोण आहे, हे न बघताच वाहन चालवतो, त्यामुळे काही प्राण्यांना जीव गमवावा लागतो. तर काहींना गंभीर इजा होते. याकडे रतन टाटा यांनी वाहनधारकांचे लक्ष वेधले.

काय केले आवाहन

रतन टाटा यांनी ट्विट करत या संवेदनशील विषयाला हात घातला. आपण प्राणीमात्रांविषयी सजग राहावे, या हेतूने त्यांनी ट्विट केले आहे. मुक्या प्राण्याविषयी आपली एक छोटी कृती त्यांना गंभीर इजेपासूनच वाचवणार नाही, तर त्यांचे प्राण पण वाचवू शकेल. प्रत्येकाने वाहन चालविण्यापूर्वी त्यांच्या चारचाकी खाली एखादा प्राणी तर नाही ना, याची खातरजमा करण्याचे आवाहन रतन टाटा यांनी केले आहे. अशा प्राण्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपाचा निवारा उपलब्ध करुन द्यावा. तशी सोय करण्याचे आवाहन पण त्यांनी केले.

भटक्या कुत्र्यांशी दोस्ती

उद्योगपती रतन टाटा यांना कुत्र्यांबदद्ल जिव्हाळा आहे. ते डॉग लव्हर आहेत, हे जगजाहीर आहे. भटक्या कुत्र्यांसाठी ते काम करतात. त्यातील अनेक कुत्रे त्यांच्याकडे आहेत. ते भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मोठी रक्कम दान करतात. गोव्यातील एका रस्त्यावर भटक असलेला कुत्रा त्यांनी सोबत घेतला. आज तोच त्यांचा सर्वात लाडका कुत्रा आहे. तो अनेकदा त्यांच्यासोबत दिसतो.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.