AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata : टाटा ग्रुपमध्ये रतन टाटांची प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून सुरुवात… मेहनत अन् सचोटीने बनले साम्राज्याचे चेअरमन

Ratan Tata: भारतात जेव्हा कोविड महामारी पसरली तेव्हा रतन टाटा यांनी तात्काळ टाटा ट्रस्टकडून 500 कोटी रुपये आणि टाटा कंपन्यांच्या माध्यमातून 1000 कोटी रुपये दिले. महामारी आणि लॉकडाऊनच्या आर्थिक परिणामांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी हा निधी दिला.

Ratan Tata : टाटा ग्रुपमध्ये रतन टाटांची प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून सुरुवात... मेहनत अन् सचोटीने बनले साम्राज्याचे चेअरमन
Ratan Tata
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 10, 2024 | 12:48 PM
Share

देशातील दिग्गज व्यावसायिक अन् टाटा ग्रुपचे चेअमरन रतन टाटा असेच मोठे झाली नाही. टाटांच्या घरात जन्म झाला तरी त्यांनी स्वत:ला सिद्ध करावे लागले. त्यासाठी कंपनीत साधारण कामगार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. कंपनीतील कामगार ते टाटा समुहाचे चेअरमन बनण्याची त्यांची यशोगाथा केवळ मेहनत अन् सचोटीची आहे.

जेआरडी यांनी मुंबईत बोलवून घेतले…

1962 मध्ये रतन टाटा यांनी जमशेदपूरमधील टाटा स्टीलमध्ये कामाला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांनी सहा वर्षे काम केले. कामाची सुरुवात त्यांनी निळ्या रंगाचे ओव्हरॉल्स परिधान करून शॉपफ्लोर वर्कर म्हणजे कामगार म्हणून केली. त्यानंतर त्यांना प्रोजेक्ट मॅनेजर बनवण्यात आले. काही काळाने ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एस.के. नानावटी यांचा विशेष सहाय्यक बनले. त्याच्या मेहनतीची चर्चा जेआरडी टाटा यांच्यापर्यंत गेली. मग जेआरडी टाटांनी त्यांना मुंबईला बोलावले. त्यांना ऑस्ट्रेलियात वर्षभरासाठी पाठवले.

या अडचणीत आलेल्या कंपन्यांची दिली जबाबदारी

जेआरडी टाटा यांनी त्यांना अडचणीत आलेली कंपनी सेंट्रल इंडिया मिल आणि नेल्कोमध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी दिली. त्यांच्या नेतृत्वात तीन वर्षांत नेल्कोचे कायपालट झाले. कंपनी नफ्यात आली. त्यानंतर 1981 मध्ये जेआरडी टाटा यांनी रतन टाटा यांना टाटा इंडस्ट्रीजची कमान दिली. या कंपनीचे टर्नओव्हर फक्त 60 लाख होते. परंतु तिचे महत्व होते. कारण स्वत: जेआरडी ही कंपनी पाहत होते.

चेअमनपदाच्या शर्यतीत नव्हतेच अन्…

जेव्हा जेआरडी 75 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांनी उत्तराधिकारीची निवड करण्याचा निर्णय घेतला. मग नानी पालखीवाला, रूसी मोदी, शाहरुख साबवाला आणि एचएन सेठना यांच्यातील कोणातरी उत्तराधिकारी बनवणार, असे रतन टाटा यांना वाटत होते. परंतु रतन टाटा यांची निवड झाली. 25 मार्च 1991 रतन टाटा समुहाचे चेअरमन बनले.

भारतात जेव्हा कोविड महामारी पसरली तेव्हा रतन टाटा यांनी तात्काळ टाटा ट्रस्टकडून 500 कोटी रुपये आणि टाटा कंपन्यांच्या माध्यमातून 1000 कोटी रुपये दिले. महामारी आणि लॉकडाऊनच्या आर्थिक परिणामांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी हा निधी दिला.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?