‘अनप्लग्ड’ टाटा: चरित्रातून जीवनपट लवकरच जगासमोर, पुस्तकासाठी महागडा लेखन करार!

लेखक थॉमस मॅथ्यू यांनी प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी पुस्तकाची प्राथमिक रुपरेषा निश्चित केली आहे. रतन टाटांच्या आयुष्यातील अनेक व्यक्तींशी चर्चा केली आहे. रतन टाटांच्या आयुष्यावरील एकमेव अधिकृत पुस्तक ठरणार आहे. पुस्तक संदर्भयुक्त असण्यावर प्रकाशन संस्थेकडून भर दिला जात आहे.

‘अनप्लग्ड’ टाटा: चरित्रातून जीवनपट लवकरच जगासमोर, पुस्तकासाठी महागडा लेखन करार!
रतन टाटा
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 7:19 PM

नवी दिल्ली : ख्यातनाम उद्योगपती रतन टाटांच्या जीवनपैलूंचा उलगडा जगासमोर होणार आहे. टाटांची अप्रकाशित गुपितं, करिअरची वळणं तसेच टाटा समूहासोबतच्या प्रवासाचा वेध चरित्रातून घेतला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था हार्पर कॉलिन्स (Harper Collins) टाटांचे चरित्र प्रकाशित करणार आहे. ‘मिंट’च्या वृत्तानुसार, हार्पर कॉलिन्सने ग्लोबल प्रिंट राईट्स, ऑडियोबुक तसेच ई-बुकचे प्रकाशन हक्क 2 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. आजवरच्या जगातील महागड्या लेखन करारांत टाटांच्या चरित्राचा समावेश होण्याची शक्यता आहे.

‘अनप्लग्ड’ टाटा:

आजवर जगासमोर न आलेले टाटा पुस्तकातून भेटीला येणार असल्याने उद्योगजगतासह जगभरातील वाचकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. हार्पर कॉलिन्सने टाटांच्या आत्मचरित्रासाठी जागतिक स्वामित्व हक्क मिळविले आहे. माजी सनदी अधिकारी थॉमस मॅथ्यू टाटांचा जीवनप्रवास शब्दबद्ध करणार आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात टाटांचे चरित्र पुस्तक वाचकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.

क्लासरुम ते बोर्डरुम:

आत्मचरित्राच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. प्राथमिक स्वरुपाच्या संशोधनासाठी कागदपत्रे, पुस्तके तसेच रतन टाटांच्या क्लासरुम ते बोर्डरुम अशा प्रवासात सोबत असणाऱ्या व्यक्तींसोबत चर्चा केली जात आहे. आजवर प्रकाशात न आलेल्या अव्यक्त पैलूंचा उलगडा यामुळे होण्यास सहाय्य होणार आहे.

अधिकृत ‘टाटाबुक’

लेखक थॉमस मॅथ्यू यांनी प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी पुस्तकाची प्राथमिक रुपरेषा निश्चित केली आहे. रतन टाटांच्या आयुष्यातील अनेक व्यक्तींशी चर्चा केली आहे. रतन टाटांच्या आयुष्यावरील एकमेव अधिकृत पुस्तक ठरणार आहे. त्यामुळे पुस्तक संदर्भयुक्त असण्यावर प्रकाशन संस्थेकडून भर दिला जात आहे.

टाटा समूह अधिकृत स्त्रोत

रतन टाटांच्या आत्मचरित्रासाठी टाटा ग्रूप माहितीचा अधिकृत स्त्रोत ठरणार आहे. लेखक मॅथ्यू यांना सर्व महत्वाची कागदपत्रे, फोटो उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. रतन टाटांच्या आजवरच्या कार्यकाळातील टाटा ग्रूपचे ऐतिहासिक निर्णय, महत्वाचे करार यांचा पुस्तकात समावेश असणार आहे.

टाटांशी चर्चा

आत्मचरित्राचे नायक रतन टाटा यांच्याशी प्रत्यक्ष संवादावर लेखक मॅथ्यू यांचा भर आहे. टाटांसोबत तासनतास चर्चा करण्यात येत असल्याचे मॅथ्यूंनी म्हटले आहे.

जगभरातील भाषेत प्रकाशन

रतन टाटांचे आत्मचरित्र केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रकाशित केले जाणार आहे. इंग्रजीसोबत अन्य भाषेत पुस्तक छापले जाईल. पुस्तकांची निर्मिती इंग्लंडमध्ये केली जाणार आहे. हार्पर कॉलिन अमेरिकेत पुस्तकाची छपाई करणार आहे.

इतर बातम्या –

वाहन उद्योग संकटात, सलग चार महिन्यांपासून वाहन विक्रीमध्ये घट

2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जपानलाही टाकणार मागे; ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

GOLD LOAN: वैयक्तिक की सोने तारण कर्ज, ‘या’ पाच कारणांमुळे ‘हा’ पर्याय सर्वोत्तम!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.