AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI AI : UPI पेमेंट अधिक स्मार्ट! AI च्या मदतीने चालता बोलता होणार व्यवहार

RBI AI : भारतीय रिझर्व्ह बँका आता एआयचा वापर पेमेंटसाठी करणार आहे. युपीआय पेमेंटसाठी एआयचा वापर होईल. त्यासाठी नवीन सिस्टम आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रीय बँकेने त्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे.

RBI AI : UPI पेमेंट अधिक स्मार्ट! AI च्या मदतीने चालता बोलता होणार व्यवहार
| Updated on: Aug 10, 2023 | 2:57 PM
Share

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आता युपीआय पेमेंटसाठी नवीन आयुध आणण्याचा विचार करत आहे. झटपट व्यवहारासाठी एआय (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार आहे. त्यासाठी नवीन सिस्टम तयार करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence-AI) आधारे UPI वर संवादाच्या माध्यमातून व्यवहार करण्यात येईल. त्यासाठी नवीन सिस्टम आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रीय बँकेने त्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आज झाली. त्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी संवादात्मक व्यवहाराची माहिती दिली.

नवीन तंत्रज्ञान दिमतीला

आरबीआय गव्हर्नर यांनी युपीआय पेमेंट करण्यासाठी संवादात्मक व्यवहारावर भर दिला आहे. एआय सिस्टम आधारे अनेक जणांना चालता-बोलता व्यवहार करता येईल. केंद्रीय बँकेने ग्राहकांना नवीन तंत्रज्ञान प्रस्तावित केले आहे.

बँका कशा करतील AI चा वापर

खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका, फिनटेक कंपन्या यांनी डिजिटल बँकिंग सेवांसाठी एआयचा वापर करण्यावर भर देत आहेत. सेवांचा विस्तार करण्यासाठी AI आणि मशीन लर्निंग टूलचा उपयोग करुन बँकिंग सेवा झटपट पोहचवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी चॅटबॉ्टसचा पण वापर करण्यात येत आहे.

या बँकांच्या सेवा

देशाच्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेकडे चॅटबॉट ईवा सेवा आहे. ही ग्राहकांना, कर्जदात्यांना बँकिग सेवा देते. एक्सिस बँक पण ChatGPT चा वापर करण्यावर भर देत आहे. भारतीय स्टेट बँकेने पण बिझनेस एनालिटिक्‍स, AI आणि ML उपयोग वाढवला आहे.

युपीआय लाईटची मर्यादा वाढवली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युपीआय लाईट माध्यमातून व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे. आरबीआय क्रेडिट पॉलिसी आधारे विना इंटरनेट UPI Lite ची सेवा सुरु करण्यात आली होती. त्यात 200 रुपयांचे पेमेंट करता येत होते. आता व्यवहाराची मर्यादा वाढवून ती 500 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे देशात डिजिटल पेमेंटचा वापर वाढेल.

रेपो दरात वाढ नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कुठलाच बदल केला नाही. यापूर्वीच तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला होता. गेल्या दोन महिन्यात महागाई वाढली आहे. पण त्याचा परिणाम भारतीय अर्थ धोरणावर होणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. आरबीआयने रेपो दर (Repo Rate) 6.50 टक्के कायम ठेवला. यापूर्वी एप्रिल आणि जून महिन्यात सुद्धा व्याजदरात वाढ झाली नाही. रेपो दरात या वर्षात, फेब्रुवारी 2023 मध्ये बदल झाला होता. त्यावेळी 0.25 टक्के वाढ झाली होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?