Digital Currency बाबत मोठी अपडेट! आता ऑफलाईन वापरा E-Rupee

Digital Currency | आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे कर्जदारांच्या कर्जाचा हप्ता कमी होणार नाही. पण तो वाढलेलाही नाही. आता आरबीआयने डिजिटल करन्सीविषयी मोठी घोषणा केली आहे. ई-रुपया आता ऑनलाईनच नाही तर ऑफलाईन सुद्धा वापरता येणार आहे.

Digital Currency बाबत मोठी अपडेट! आता ऑफलाईन वापरा E-Rupee
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 2:59 PM

नवी दिल्ली | 8 February 2024 : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईवर फोकस केला आहे. यामुळे कर्जदारांना मोठा फायदा झाला नसला तरी त्यांचा ईएमआय वाढणार नाही, हाच एक दिलासा मिळाला. आता आरबूीआयने डिजिटल करन्सीविषयी महत्वाची अपडेट समोर आणली आहे. डिजिटल करन्सी हे आरबीआयचे पुढील पाऊल आहे. युपीआयनंतर ई-रुपयावर आरबीआय भर देत आहे. हा ई-रुपया ठराविक बँकांद्वारे देण्यात येत आहे. पण तो ऑनलाईन मिळतो. आता ई-रुपया ऑफलाईन सुद्धा वापरता येईल.

लवकरच करता येईल वापर

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी इंटरनेट उपलब्ध नसलेल्या प्रदेशात ई-रुपयाचा वापर करण्यार भर दिला आहे. या भागात लवकरच डिजिटल रुपयात व्यवहार करता येतील, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय बँक डिजिटल मुद्रा (CBDC) पथदर्शी प्रकल्पात ऑफलाईन डिजिटल रुपयाच्या वापर करता येईल.

हे सुद्धा वाचा

पथदर्शी प्रकल्प पथ्यावर

शक्तिकांत दास यांनी ई-रुपयाच्या वापरासंबंधीची माहिती दिली. त्यानुसार, सध्या हा पथदर्शी प्रकल्प आहे. डिसेंबर 2022 मध्ये सामान्य व्यवहारासाठी त्याचा वापर सुरु झाला. हा पथदर्शी प्रकल्प डिसेंबर 2023 मध्ये एका दिवसात 10 लाखांच्या व्यवहाराचे उद्दिष्ट गाठण्यात आले. युनिफाईट पेमेंट इंटरफेस (UPI) शिवाय इतर अनेक ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म ऑफलाई पेमेंटची सुविधा देतात.

सध्या असा होतो वापर

सध्याच्य पथदर्शी प्रकल्पात बँका डिजिटल रुपया वॉलेटचा वापर करुन व्यक्ती ते व्यक्ती (पी2पी) आणि व्यक्ती ते व्यापारी (पी2एम) असा व्यवहार करता येतो. ऑफलाईन पेमेंट झाल्यावर ई-रुपयाच्या वापरात मोठी वाढ दिसून येईल, असा दावा करण्यात येत आहे. तसेच अनेक सेवांसाठी ई-रुपयांचा वापर वाढेल. पण ऑफलाईन सेवेचा वापर कसा होईल, हे अद्याप समोर आले नाही. येत्या काही दिवसात याविषयीची माहिती समोर येईल.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.