RBI Repo Rate: आरबीआयने दिली मोठी बातमी! घर, वाहनांचा EMI वाढला की कमी झाला? लगेच घ्या जाणून

जर तुम्ही दरमहा गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जाचा ईएमआय भरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. मध्य पूर्वेतील जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

RBI Repo Rate: आरबीआयने दिली मोठी बातमी! घर, वाहनांचा EMI वाढला की कमी झाला? लगेच घ्या जाणून
| Updated on: Aug 05, 2026 | 11:17 AM

जर तुम्ही दरमहा गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जाचा ईएमआय भरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. मध्य पूर्वेतील जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मध्यवर्ती बँकेने सलग पाचव्यांदा रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी आर्थिक वर्ष 2027 च्या तिसऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यानंतर आपल्या भाषणात सांगितले की, रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम राहील. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रमुख धोरणात्मक दरात कोणताही बदल न केल्यामुळे, गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते अपरिवर्तित राहतील. याचा अर्थ तुम्हाला पूर्वीप्रमाणेच हप्ते भरावे लागतील. या MPC मिटींगमध्ये आरबीआयचा भर महागाई नियंत्रणात ठेवण्यावर आणि आर्थिक वाढ कायम राखण्यावर होता. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या घोषणेपूर्वी, व्यापार सत्राच्या सुरुवातीला देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली.

आरबीआयने शेवटचा रेपो दरात बदल ऑक्टोबर 2025 मध्ये केला होता. त्यावेळी, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. त्यानंतर, डिसेंबर, फेब्रुवारी, एप्रिल, जून आणि आता ऑगस्टच्या पतधोरण समितीमध्ये रेपो दर पूर्वीच्या पातळीवरच राहिला. आरबीआयने 2025 मध्ये तीन वेळा एकूण 125 बेसिस पॉइंट्सची (1.25%) रेपो दरात कपात केली. वाढत्या महागाईची भीती आणि अपेक्षित मंद जीडीपी वाढीमुळे रेपो दरात कोणताही बदल झाला नाही.

रेपो दर म्हणजे काय?

आरबीआय ज्या दराने बँकांना कर्ज देते, त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेटमध्ये वाढ होण्याचा अर्थ असा आहे की बँकांना आरबीआयकडून जास्त दराने कर्ज मिळेल. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदर वाढतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या ईएमआयवर होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us