AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI च्या आदेशामुळे लोकांना दिलासा, डिजिटल फ्रॉडसाठी आता नवीन नियम जारी, पाच दिवसांच्या आत…

तुमच्या क्रेडिट कार्डवर फसवणुकीचा व्यवहार झाल्यास, तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी आता तुम्हाला जास्त वेळ वाट पाहण्याची गरज नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक नवीन नियम जारी केला आहे.

RBI च्या आदेशामुळे लोकांना दिलासा, डिजिटल फ्रॉडसाठी आता नवीन नियम जारी, पाच दिवसांच्या आत...
rbi credit card rule
| Updated on: Jun 25, 2026 | 1:10 PM
Share

आजच्या युगात डिजिटल पेमेंट आणि क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढत आहे. ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणेही सातत्याने समोर येत आहेत. लाखो बँक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने एक नवीन नियम जारी केला आहे. या नवीन नियमानुसार, जर एखाद्या ग्राहकाच्या क्रेडिट कार्डचा वापर फसवणुकीसाठी झाला आणि त्यांनी बँकेला याची तक्रार केली, तर बँकेने पाच दिवसांच्या आत रकमेसाठी तात्पुरते क्रेडिट देणे बंधनकारक आहे. आरबीआयच्या मते, जर ग्राहकाच्या क्रेडिट कार्डचा वापर करून फसवणुकीचा इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहार झाला आणि ग्राहकाने बँकेला याची तक्रार केली, तर बँकेने तक्रार मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत त्या रकमेचे ‘शॅडो रिव्हर्सल’ करणे बंधनकारक आहे. याचा अर्थ असा की, तपास पूर्ण होईपर्यंत ग्राहकावर रकमेचा बोजा पडणार नाही आणि त्यांच्या क्रेडिट कार्ड बॅलन्सवर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारले जाणार नाही. हे नवीन नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होतील.

आरबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की, “बँकेच्या निष्काळजीपणामुळे किंवा प्रणालीगत त्रुटींमुळे फसवणूक झाल्यास, ग्राहक जबाबदार राहणार नाही. अशा प्रकरणांमध्ये, ग्राहकाने तक्रार दाखल केली असो वा नसो, त्याला संपूर्ण रक्कम परत मिळेल. शिवाय, जर फसवणूक तिसऱ्या पक्षाकडून झाली असेल आणि ग्राहकाने घटनेच्या पाच दिवसांच्या आत बँकेला कळवले, तरीही ग्राहकावर कोणतीही जबाबदारी राहणार नाही आणि त्याला संपूर्ण रक्कम परत मिळेल. जर ग्राहकाने पाच दिवसांनंतर तक्रार दाखल केली, तर त्यांची जबाबदारी बँकेच्या धोरणानुसार निश्चित केली जाईल.

सर्व मोठ्या व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट नवीन नियमांनुसार बँकांना ₹500 पेक्षा जास्त रकमेच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यव्हारासाठी तात्काळ एसएमएस अलर्ट पाठवणे बंधनकारक असेल.  ₹500 पर्यंतच्या व्यवहारांसाठी बँका त्यांच्या अंंतर्गत धोरणांनुसार अलर्ट पाठवू शकतात, परंतु त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आरबीआयने म्हटले की, बँकानी ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित करणारी आणि फसवणुकीच्या घटनेत त्वरित कारवाई सुनिश्चित करणारी प्रणाली विकसित केली पाहिजे.

केंद्रीय बँकेने लहान रकमेच्या डिजिटल फसवणुकीच्या पीडितांना दिलासाही दिला आहे. जर एखाद्या ग्राहकाला फसवणुकीमुळे ₹50,000 पर्यंतचे नुकसान झाले आणि तर, त्याला झालेल्या नुकसानीच्या रकमेच्या 85 टक्के म्हणजेच कमाल ₹25,000 ची भरपाई दिली जाईल. ही सुविधा ग्राहकाला त्याच्या आयुष्यात एकदाच उपलब्ध आहे.

Follow Us
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान