
Home Loan Car Loan: भारतीय रिझर्व्ह बँकेने 5 डिसेंबर रोजी रेपो दरात 25 बेसिस पाईंट्सची कपात केली. रेपो दर 5.50 टक्क्यांहून थेट 5.25 टक्क्यांवर घसरला. RBI ने रेपो दर कमी करताच देशातील चार मोठ्या बँकांनी ग्राहकांना आनंदवार्ता दिली. या बँकांनी व्याजदरात कपात केली. या 4 बँकांनी रेपो बेस्ड लेंडिंग रेट्स(RBLR) आणि रेपो बेंचमार्क रेंट्समध्ये कपात केली आहे. नवीन लेंडिंग रेट्स लागू झाल्याने गृहकर्ज, वाहन कर्जावरील व्याजदर कमी होईल. यामुळे कर्जावरील EMI, हप्ता कमी होईल. हप्ता कमी झाल्याने त्याची दर महिन्याला बचत होईल. त्याच्यावरील ईएमआयचे ओझे कमी होईल.
रेपो दर हा एक व्याज दर आहे. त्या आधारावर RBI इतर बँकांना उधार रक्कम देते. म्हणजेच कर्ज रक्कम देते. जेव्हा बँकांकडे खेळते भांडवल कमी होते. तेव्हा बँका सरकारी बाँड गहाण ठेवून केंद्रीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. या कर्जावर केंद्रीय बँक व्याज वसूल करते. त्यालाच Repo Rate असं म्हणतात. जेव्हा RBI रेपो दर वाढवते. तेव्हा बँकांना अधिकचा व्याजदर मोजावा लागतो. तर जेव्हा आरबीआय रेपो दर घटवते. तेव्हा बँकांना पण स्वस्त दराने व्याज मिळते.
आरबीआयने यावर्षात रेपो दरात चार वेळा कपात केली. फेब्रुवारी ते जून महिन्यात तीनदा कपात झाली तर डिसेंबर महिन्यात असा चार वेळा Repo Rate घसरला. एकूण 1.25 टक्क्यांची कपात केली. फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत एकूण एक टक्का रेपो दर घटवला होता. पण ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात कोणताही बदल झाला नाही. नवीन 0.25 टक्क्यांच्या कपातीमुळे रेपो दर हा 5.25 टक्क्यांवर आला आहे.
या चार बँकांनी दिली आनंदवार्ता
सरकारी बँक, बँक ऑफ बडोदाने BoB ने रेपो दराशी संबंधित व्याज दरात 0.25 टक्क्यांची कपात केली. बडोदा लिंक्ड लेंडिंग रेट(BRLLR) 8.15 टक्क्यांहून कमी होऊन आता 7.90 टक्क्यांवर आला आहे. तर दुसरी सरकारी बँक इंडियन बँकेने (Indian Bank) आरबीआयच्या निर्णयानंतर रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट कमी केला. रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट 8.2 टक्क्यांहून 7.95 टक्क्यांवर आला.
बँक ऑफ इंडियाने (Bank Of India) रेपो बेस्ड लेंडिंग रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केली. हा दर आता 8.1 टक्के केला आहे. पतधोरण समितीच्या निर्णयानंतर बँकेने हा निर्णय घेतला. तर खासगी बँक करुर वैश्य बँकने EBR-R मध्ये 0.25 टक्के कपात केली. आता व्याज दर 8.80 टक्क्यांहून 8.55 टक्के इतका आहे. इतर बँका पण व्याजदरात कपात करण्याची घोषणा लवकरच करतील.