AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाला ठोठावला 1 कोटीचा दंड, कारण काय?

नवे निर्बंध 24 नोव्हेंबरपासून सहा महिन्याकरिता लागू राहतील. सहकारी बँकांना सूचना जारी करणे म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये, असंही आरबीआयने स्पष्ट केले. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील, असे निर्देशांमध्ये म्हटलेय. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार या सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करू शकते, असे निवेदनात म्हटलेय.

RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाला ठोठावला 1 कोटीचा दंड, कारण काय?
रिझर्व्ह बँक
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Nov 26, 2021 | 8:35 PM
Share

नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाला 1 कोटीचा दंड ठोठावलाय. आरबीआयने केलेल्या तपासणीत एसबीआयने कर्ज घेणाऱ्या कंपनीमध्ये जास्तीचे शेअर्स विकत घेतल्याचे आढळून आलेय. कर्जाच्या बदल्यात कंपनीने बँकेला शेअर्स देऊ केलेत. कोणत्याही बँकेसाठी तारण मर्यादा पेड-अप शेअर भांडवलाच्या कमाल 30 टक्क्यांपर्यंत असू शकते.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 16 नोव्हेंबरला आदेश जारी

भारतीय रिझर्व्ह बँकेने 16 नोव्हेंबरला हा आदेश जारी केलाय. RBI चा हा निर्णय बँकिंग नियमन कायदा 1949 च्या उपकलम (2) च्या तरतुदींनुसार घेण्यात आलाय. आरबीआयने कलम 47 अ(1)(सी) अंतर्गत आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून हा आदेश जारी केलाय.

निर्बंध 24 नोव्हेंबरपासून सहा महिन्याकरिता लागू राहतील

नवे निर्बंध 24 नोव्हेंबरपासून सहा महिन्याकरिता लागू राहतील. सहकारी बँकांना सूचना जारी करणे म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये, असंही आरबीआयने स्पष्ट केले. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील, असे निर्देशांमध्ये म्हटलेय. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार या सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करू शकते, असे निवेदनात म्हटलेय.

यापूर्वीच दंड आकारण्यात आला

याआधीही आरबीआयने अनेक सहकारी बँकांना दंड ठोठावला असून, अनेकांवर बंदी घातली. यामध्ये मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक आणि गडहिंग्लज नागरी सहकारी बँक, अशा नागरी सहकारी बँकांची नावे आहेत. RBI ने मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर नो युवर कस्टमर (KYC) वर दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 2.00 लाखांचा आर्थिक दंड ठोठावला.

निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल ठोठावला दंड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरही आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड करण्यात आला. या कारवाईअंतर्गत दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. आरबीआयच्या कारवाईतील तिसरी सहकारी बँक गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आहे, जी महाराष्ट्रातील गडहिंग्लज येथे आहे. त्यावर RBI ने 10 लाखांचा दंड ठोठावला होता. या तिन्ही नागरी सहकारी बँका आहेत.

संबंधित बातम्या

RBI ने TCPSL ला 2 कोटी आणि ATPL ला 54.93 लाखांचा दंड ठोठावला, काय आहे प्रकरण?

भारत सरकारकडून My Home Group चा सन्मान; चांगल्या कार्यासाठी गौरव

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?