Reliance : रिलायन्सचं इन्डिपेन्डन्स ! कशाचे स्वातंत्र्य साजरं करणार अंबानी यांचा उद्योग समूह? काय आहे नवीन अवतार..

Reliance : Reliance समूह लवकरच इन्डिपेन्डन्स बाजारात उतरविणार आहे.

Reliance : रिलायन्सचं इन्डिपेन्डन्स ! कशाचे स्वातंत्र्य साजरं करणार अंबानी यांचा उद्योग समूह? काय आहे नवीन अवतार..
आता नवीन ब्रँडImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 8:55 PM

नवी दिल्ली : तुम्हाला आता बाजारात रिलायन्स समूहाची डाळी आणि कडधान्य मिळेल. खाद्यतेल (Edible Oil) आणि मसालेही (Masala)  मिळतील. खाद्यपदार्थातील इतर सामानही तुम्हाला या समूहाकडून खरेदी करता येईल. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची उपकंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (Reliance Consumer Products) हे उत्पादन बाजारात घेऊन येत आहे. समूहाने गुरुवारी याविषयीची घोषणा केली. कंपनीने त्यासाठी नवीन ब्रँड विकसीत केला असून गुजरातमध्ये या नवीन ब्रँडची घोषणा करण्यात आली.

Reliance Consumer Products आता त्यांचा गुड्स ब्रँड इंडिपेन्डन्स (Independence) बाजारात घेऊन येत आहे. गुरुवारी गुजरातमध्ये याविषयीची घोषणा करण्यात आली. या ब्रँड अतंर्गत रोजच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंचे उत्पादन करण्यात येईल आणि विक्री ही करण्यात येणार आहे.

FMCG उद्योगात गुजरात राज्याला Go-To-Market तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गुजरातच नाही तर इतर राज्यातही याच धरतीवर काम करण्यात येणार आहे. हा ब्रँड लवकरच राष्ट्रीय स्तरावर आणण्यात येईल. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

येत्या काही महिन्यात कंपनी पूर्ण गुजरात राज्यात FMCG रिटेलर्सला आपलेसे करणार आहे. त्यांच्यापर्यंत पोहचणार आहे. रिलायन्स रिटेल व्हेचर्सची संचालिका ईशा अंबानी (Isha Ambani) यांनी या ब्रँडची घोषणा केली. FMCG मधील या ब्रँडची सुरुवात करताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

खाद्यतेल, डाळी, कडधान्ये, धान्य, पॅक्जेड फूड्स आणि दुसऱ्या दैनंदिन उपयोगी वस्तू आणि उत्पादने स्वस्तात देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ईशा अंबानी यांनी स्पष्ट केले. भारतीय बाजारातील उणीव भरून काढण्यासाठी हा ब्रँड भारतीय उपाय ठरेल असा दावा त्यांनी केला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक मुकेश अंबानी यांनी ऑगस्ट महिन्यातील 45 व्या बैठकीत एफएमसीजी बाजारात उडी घेण्याची घोषणा केली होती. या ब्रँडमुळे आता युनिलिव्हर आणि आयटीसी या कंपन्यांना जोरदार आव्हान उभं राहणार आहे. क्वालिटी प्रोडक्ट स्वस्तात उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे ईशा अंबानी यांनी स्पष्ट केले.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. या कंपनीकडे RIL समूहाचे सर्व रिटेल बिझनेस आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 1.99 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली. कंपनीला एकूण 7,055 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

Non Stop LIVE Update
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.