Mukesh Ambani : मँचेस्टर-लिव्हरपूलची चर्चा पडली मागे, उद्योजक मुकेश अंबानी खरेदी करणार इंग्लंडमधील हा क्लब, मुलगा आकाश ही क्लबचा बिग फॅन !

Mukesh Ambani : या क्लबच्या खरेदीसाठी अंबानी समूहाच्या हालचाली सुरु आहेत..

Mukesh Ambani : मँचेस्टर-लिव्हरपूलची चर्चा पडली मागे, उद्योजक मुकेश अंबानी खरेदी करणार इंग्लंडमधील हा क्लब, मुलगा आकाश ही क्लबचा बिग फॅन !
हा क्लब होऊ शकतो मालकीचाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 6:19 PM

नवी दिल्ली : जगातील टॉप-10 श्रीमंतातील उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) एका मोठ्या खरेदीच्या तयारीत आहेत. इंग्लंडमधील (England) एका क्लबवर त्यांची नजर आहे. त्यासाठी ते लवकरच एक करार करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीही याविषयीच्या बातम्या आल्या होत्या. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) लिव्हरपूल क्लब (Liverpool) खरेदी करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यापूर्वी या यादीत मॅनचेस्टर क्लबचे (Manchester) नाव होते. पण ही दोन्ही नावे आते मागे पडली आहेत.

या दोन्ही क्लबसाठी रिलायन्स समूह आग्रही असल्याचे बोलल्या जात होते. पण नंतर ही नावे मागे पडली. आता पुन्हा रिलायन्स ग्रूप इंग्लंडमधील एका क्लबसाठी इच्छुक असल्याच्या बातम्या येत आहे. आता आर्सेनल क्लबचे (Arsenal Club) नाव समोर आले आहे.

बिझनेस टुडेच्या एका अहवालानुसार, मुकेश अंबानी मॅनचेस्टर युनायटेड वा लिव्हरपूल क्लबऐवजी आर्सेनेल एफसीवर बोली लावू शकतात. सध्या इंग्लंडमधील अनेक क्लब विक्रीच्या तयारीत असून ते मालकाच्या शोधात आहेत.

हे सुद्धा वाचा

आर्सेनल क्लब हा व्यावसायिकदृष्ट्या सर्वात यशस्वी क्लब होता. आर्सेनल प्रीमिअर लीगमध्ये या क्लबने चमकदार कमाई केली आहे. या क्लबने 13 लीगमध्ये अनेक कप जिंकले आहेत. या क्लबचे मालक आर्सेनल होल्डिंग्स लिमिटेडकडे आहे. या कंपनीचे अधिकार UK INC कडे आहेत. त्यात Stanley Kroenke यांचा 100 टक्के हिस्सा आहे.

The Athletic मधील एका लेखातील दाव्यानुसार, मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी हे आर्सेनल क्लबचा मोठा फॅन आहे. त्यामुळे फुटबॉल जगतात पुन्हा फेरबदल होऊन हा क्लब लवकरच अंबानी समूहाचा होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.