AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सनी देओल स्टारर ‘बॉर्डर’ पाहताना 59 जणांचा मृत्यू, आग… सर्वत्र धुराचे लोट…चिंगराचेंगरी…, तेव्हा नक्की काय घडलेलं?

Sunny Deol Starrer Border: 'बॉर्डर' पाहताना चित्रपटगृहात नक्की काय झालेलं... सर्वत्र धुराचे लोट...चिंगराचेंगरी... काही क्षणात 59 जणांनी गमावले प्राण... जाणून व्हाल हैराण..., प्रचंड धक्कादायक आहे घटना...

सनी देओल स्टारर 'बॉर्डर' पाहताना 59 जणांचा मृत्यू, आग... सर्वत्र धुराचे लोट...चिंगराचेंगरी..., तेव्हा नक्की काय घडलेलं?
बॉर्डर
| Updated on: Feb 02, 2026 | 10:04 AM
Share

Sunny Deol Starrer Border: अभिनेता सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. मोठ्या संख्येने सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहात होत आहे. ‘बॉर्डर 2’ सिनेमा पाहत असताना, अनेकांनी 1997 च्या आठवणी ताज्या केल्या. सांगायचं झालं तर, 1997 मध्ये ‘बॉर्डर’ सिनेमा प्रदर्शित झालेला. पण सिनेमा मोठ्या पडद्यावर आल्यानंतर असं काही घडलं ज्यामुळे 59 जणांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. उपहार अग्निकांड आठवल्यानंतर आज भयानक चित्र समोर येतं. या अग्निकांवर आधारिक एक सीरिज 2023 मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालेली. सीरिजचं नाव आहे ‘ट्रायल बाय फायर’… सांगायचं झालं तर, ही धक्कादायक घटना दिल्ली येथील ग्रीन पार्क स्थित उपहार चित्रपटगृह येथे घडली होती.

उपहार अग्निकांडमध्ये गमावले 59 जणांनी प्राण…

1997 हे वर्ष हिंदी सिनेमासाठी उत्तम ठरलं… तेव्हा अभिनेता शाहरुख खान स्टारर तीन सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेले. गोविंदा, अनिल कपूर यांसारखे अभिनेते तेव्हा अव्वल स्थानी होते. अशात दिग्दर्शक जेपी दत्ता यांनी ‘बॉर्डर’ सिनेमा प्रदर्शित केला… ‘बॉर्डर’ सिनेमाचे पोर्स्टर सर्वत्र लागल्यानंतर, प्रेक्षकांमध्ये देशभक्तीवर आधारित असलेल्या सिनेमाची क्रेझ होती.

अखेर 13 जून 1997 मध्ये ‘बॉर्डर’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सर्व शो हाऊस फूल झाले. देशभरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालेलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असताना असं काही घडलं ज्यामध्ये 59 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 23 तर फक्त लहान मुलं होतं आणि त्यामधील एक बाळ फक्त 1 महिन्यांचं होतं. या घटनेक अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. ‘बॉर्डर’ सिनेमा पाहत असताना अचानक चित्रपटगृहाला आग लागली… शॉर्ट सक्रिटमुळे आग लागल्याचं कारण समोर आलं.

चित्रपटगृहात सर्वत्र धुराचे लोट पसरलेले होते.. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण बाहेरच्या दिशेने पळू लागलेला… यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि अनेकांनी स्वतःचे प्राण गमावले… रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, कोणाचंच निधन आग लागून झालं नाही, तर धूर आणि श्वास कोंडल्यामुळे अनेकांनी प्राण गमावले..

उपहार अग्निकांडवर आधारित सीरिज

प्रशांत नायर आणि रणदीप झा यांनी या प्रकरणावर आधारित ‘ट्रायल बाय फायर’ नावाची सीरिज बनवली. या सीरिजमध्ये अभय देओल आणि राजश्री देशपांडे यांनी उपहार आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन मुलांच्या पालकांची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये त्यांचा संघर्ष, न्यायाचा शोध आणि त्यांच्या न्यायालयीन लढाईचं चित्रण आहे. या सीरिजला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की, 2023 च्या फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारांमध्ये सीरिजला सहा नामांकने मिळाली होती.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...