Richest Woman : कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला? या उद्योजिका ही नाहीत मागे..

| Updated on: Dec 13, 2022 | 6:01 PM

Richest Woman : जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत..

Richest Woman : कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला? या उद्योजिका ही नाहीत मागे..
सर्वात श्रीमंत महिला
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : सर्वांनाच श्रीमंतीची आणि श्रीमंतांची भुरळ असते. प्रत्येक वेळी जगभरातील श्रीमंतांची, त्यांच्या मेहनतीची, त्यांच्याकडील संपत्तीची चर्चा होते. जगातील सर्वात श्रीमंत महिला (World’s Richest Woman) कोण आहेत? हा प्रश्न सर्वांचीच उत्सुकता ताणवते. तर L’Oréal या सौंदर्य प्रसाधनाचं (Beauty Product) नाव तुम्ही तर ऐकलंच असेल अथवा ते वापरलं तरी असेल. तर या सौंदर्य प्रसाधन कंपनीची मालक फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स (Francoise Bettencourt Meyers) या जगातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका आहेत.

मेयर्स या L’Oréal च्या संस्थापकांची नात आहे. त्यांची एकूण संपत्ती 74.6 दशलक्ष डॉलर आहे. L’Oréal च्या सौंदर्य उत्पादनातून जी कमाई होते, त्यामधून फ्रेंकोईस या श्रीमंत झाल्या आहेत. त्यांनी श्रीमंत महिलांच्या यादीत पहिले स्थान पटकावलं आहे.

फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स यांच्यानंतर वॉलमार्टच्या (Walmart Inc.) संस्थापकांची मुलगी ऐलिस लुईस वाल्टन (Alice Walton) यांचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती 60.9 दशलक्ष डॉलर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर जुलिया कोच (Julia Koch) यांचं नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती 58 दशलक्ष डॉलर आहे.

हे सुद्धा वाचा

फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स यांच्या आईनेही श्रीमंतांच्या यादीत नाव पटकावलं आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल. त्यांची आई लिलियन बेटेनकोर्ट (Liliane Bettencourt) यांचं वयाच्या 94 व्या वर्षी सप्टेंबर 2017 मध्ये मृत्यू झाला. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलीने या यादीत नाव कोरलं आहे.

फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स यांना श्रीमंतीची शिडी चढणे काही सोपे काम नव्हते. कारण त्यांना त्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागला. L’Oréal कंपनीत अधिकार प्राप्त करण्यासाठी त्यांना आईच्या मैत्रिणीशी कायदेशीर लढा द्यावा लागला.

या न्यायालयीन लढाईत त्यांनी विजय मिळवला. फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर झाल्या. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मने जिंकली. त्यांनी सूत्र हाती घेतल्यापासून कंपनीने नफा नोंदविल्याचा दावा करण्यात येत आहे.