
भारताच्या अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानींसह अनेक दिग्गजांचा समावेश होतो. चीमधये झोंग शानशान आणि झांग यिमिंग यांचे नाव श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर आहे. भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये पण एक व्यक्ती श्रीमंतांमध्ये अव्वल आहे. त्यांचा उद्योग व्यवसाय जगातील 100 देशांमध्ये पसरलेला आहे. त्यांना नेपाळचे अंबानी असे म्हटल्या जाते. एक विशेष बाब म्हणजे बिनोद चौधरी हे नेपाळचे एकमेव अब्जाधीश आहेत.
शेजारील देश नेपाळचे बिझनेस टायकून बिनोद चौधरी 12 वेगवेगळ्या क्षेत्रात जवळपास 136 कंपन्यांचे मालक आहेत. ते नेपाळच्या व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रातील कलदारच नाही तर राजकारणातही सक्रीय आहेत. बिनोद चौधरी हे चौधरी समूहाचे CG Corp Global चे अध्यक्ष आहे. हा समूह बँकिंग, हॉटेल आणि एफएमसीजीसह ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य सेवेत आघाडीवर आहे.
किती संपत्तीचे मालक बिनोद चौधरी?
Forbes नुसार, नेपाळचे एकमेव अब्जाधीश असलेले बिनोद चौधरी यांची रिअल टाईम नेटवर्थ ही 2 अब्ज डॉलर म्हणजे 17,000 कोटी रुपये इतकी आहे. बिनोद चौधरी यांची बिझनेस फर्म नेपाळमध्ये बँकिंगसह हॉटेलपर्यंत अनेक व्यवसाय आणि उद्योगांचे संचलन करते. त्यांच्या एफएमसीजी अंतर्गत जे नुडल्स तयार होतात. ते भारतातच नाही तर जगभरात अत्यंत लोकप्रिय आहेत. दक्षिण आशिया देशात त्यांना अधिक मागणी आहे.
चौधरी यांच्या उद्योग साम्राज्याची सुरुवात 1984 मध्ये झाली. बिनोद चौधरी नेपाळमधील नबील बँकेचे मालक आहेत. चौधरी यांचे सीजी हॉस्पिटॅलिटी फर्म 12 देशांमध्ये 195 हॉटेल, रिसॉर्ट आणि वेलनेस सेंटरचे व्यवस्थापन करते. या कंपनीची ताज, ताज सफारी आणि विवांता सारख्या ब्रँड्ससोबत भागीदारी आहे.
भारताशी खास नाते
बिनोद चौधरी यांचे भारताशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यांचा जन्म काठमांडू येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा राजस्थानहून नेपाळमध्ये व्यापारानिमित्त गेले आणि तिथेच स्थायिक झाले. बिनोद चौधरी यांच्या वडिलांनी नेपाळमध्ये पहिले डिपार्टमेंटल स्टोअर सुरु केले होते. आता त्यांची तिसरी पिढी उद्योगविश्वात नाव कमावत आहे. नवीन पिढी सुद्धा उद्योगात नवनवीन प्रयोग करत आहे. त्यामुळे हा उद्योगसमूह भरभराटीला आला आहे.