जगातील सर्वात छोट्या देशाकडे अलाउद्दीनचा चिराग! देश, येथील प्रत्येक व्यक्तीची कमाई 10 लाख, काय गौडबंगाल?
Richest Small Country in the World : तर जगातील या देशातील प्रत्येक व्यक्तीकडे जणू अलाउद्दीनचा चिराग आहे. कारण या देशातील लोकांना अगदी कमी कर भरावा लागतो. तर येथील प्रत्येक व्यक्तीची कमाई 10 लाख इतकी आहे.

युरोपमधील सर्वात छोटा देश लेंक्झबर्ग (Luxembourg )हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. या देशाचे क्षेत्रफळ केवळ 2,586 km² इतके आहे. तर या देशाची लोकसंख्या अवघी 6.5 लाख आहे. पण येथील नागरिकांचे राहणीमान अत्यंत आलिशान आहे. येथे जणू एखादी पैशांची नदी वाहते. हा देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. World of Statistics च्या अहवालानुसार, लेंक्झबर्गचा GDP per capita (PPP) जवळपास $140,941 इतका आहे. भारतीय चलनात 1,25,15,758 रुपये इतकी त्याची किंमत आहे. येथील व्यक्ती महिन्याला सरासरी 10.42 लाख रुपयांची कमाई करतो. येथील नागरिकांकडे जणू अलाउद्दीनचा चिराग आहे.
लेंक्झबर्गची आर्थिक शक्ती काय?
लेंक्झबर्गची खरी आर्थिक शक्ती वा आर्थिक स्त्रोत हा बँकिंग इंडस्ट्री आहे. येथील गुंतवणुकीवर अत्यंत कमी दर आकारण्यात येतो. येथे बँकांचे जणू पीक आलेले आहे. येथील लोकसंख्येपेक्षा बँका आणि त्यांच्या शाखा अधिक असल्याचा दावा करण्यात येतो. येथे नागरिकांना अत्यंत कमी कर भरावा लागतो. त्यामुळे लेंक्झबर्ग हा देश युरोपातील स्वर्ग मानण्यात येतो. याला टॅक्स पॅराडाईज असं म्हटल्या जाते.
देशात शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणावर भर
या देशातील नागरिकांचे जीवनमान, राहणीमान अत्यंत उच्च आहे. हा देश अत्यंत प्रगत आहे. येथे सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेवर अधिक खर्च होतो. हा जगातील सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ देश गणल्या जातो. येथील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत. उद्योगांमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते.
लेंक्झबर्गमध्ये कोणत्याचा भाषेचा वापर?
लेंक्झबर्गमध्ये 3 अधिकृत भाषांचा वापर करण्यात येतो. यामध्ये लेंक्झबर्गिश, फ्रेंच आणि जर्मन भाषेचा वापर होतो. या देशाची राजधानी लेंक्झबर्ग शहर आहे. हे शहर आधुनिकता आणि ऐतिहासिक संस्कृतीचे मिलाफ आहे. देशाची कर रचना, कर धोरण आणि आर्थिक धोरण नागरिकांसाठी जगात सर्वात अनुकूल आहे. कमी कर, बँकिंग सुविधा आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी यामुळे येथील नागरीक जणू एखाद्या स्वर्गीय भूमित वावरत असल्याचा भास होतो. लेंक्झबर्ग केवळ श्रीमंत आहे असे नाही तर तो सुरक्षीत आणि समृद्ध, संपन्न आणि प्रगत देश आहे.
