SBI ने ग्राहकांना बनावट ग्राहक सेवा क्रमांकांपासून केले सावध, एक चूक अन् बँक खाते रिकामी

| Updated on: Sep 19, 2021 | 10:59 AM

लोकांना बळी पाडण्यासाठी सायबर गुन्हेगार विविध डावपेच अवलंबत आहेत. ग्राहकांना त्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी बँका देखील वेळोवेळी आपल्या ग्राहकांना सावध करत राहतात. यात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बनावट ग्राहक सेवा क्रमांकांबाबत अलर्ट जारी केलाय.

SBI ने ग्राहकांना बनावट ग्राहक सेवा क्रमांकांपासून केले सावध, एक चूक अन् बँक खाते रिकामी
एसबीआय
Follow us on

नवी दिल्लीः कोरोनाच्या काळात डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झालीय. ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणही लक्षणीय वाढलीत. लोकांना बळी पाडण्यासाठी सायबर गुन्हेगार विविध डावपेच अवलंबत आहेत. ग्राहकांना त्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी बँका देखील वेळोवेळी आपल्या ग्राहकांना सावध करत राहतात. यात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बनावट ग्राहक सेवा क्रमांकांबाबत अलर्ट जारी केलाय.

बनावट ग्राहक सेवा क्रमांकापासून सावध राहा

एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली. एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, बनावट ग्राहक सेवा क्रमांकापासून सावध राहा. कृपया योग्य ग्राहक सेवा क्रमांकासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. कोणाशीही गोपनीय बँकिंग माहिती शेअर करण्यापासून परावृत्त करा. ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये बँकेने म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याची त्वरित तक्रार करा. तुम्ही report.phising@sbi.co.in किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 155260 वर कॉल करू शकता.

खाते असे रिकामे होते?

बनावट ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल केल्यावर फसवणूक करणारे तुमच्याकडून बँक खात्याचा तपशील घेतात आणि नंतर तुमच्या बँक खात्यातून सर्व पैसे काढतात. फोनवर ते तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, खाते क्रमांक, डेबिट कार्ड नंबर, ओटीपी विचारतात आणि नंतर खाते रिकामे करतात. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला कस्टमर केअर नंबर आठवत नाही, तेव्हा नंबर मिळवण्यासाठी नेहमी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

फिशिंग लिंक्सपासून सावध राहा

यापूर्वी बँकेने आपल्या ग्राहकांना डिजिटल फसवणूक किंवा ऑनलाईन फिशिंगबाबत अलर्ट केले होते. बँक म्हणाली, तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये असे लिंक मिळत आहेत का? त्यांच्यावर क्लिक करू नका. अशा फिशिंग लिंकवर क्लिक केल्याने तुमचे मेहनतीचे पैसे नष्ट होऊ शकतात. सावध राहा, अशा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.आपल्या सर्वांना माहीत आहे की ऑनलाईन ठग सहजपणे भोळ्या लोकांना अडकवतात आणि त्यांच्या बचत खात्यातील सर्व पैसे त्यांच्या खात्यात हस्तांतरित करतात.

संबंधित बातम्या

30 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक खातेदाराला 5 लाख मिळणार; ‘या’ बँकांमध्ये तुमचे खाते आहे का?

4 लाखांच्या फायद्यासाठी दरमहा फक्त 28 रुपये जमा करा, जाणून घ्या SBI ची योजना

SBI warns customers against fake customer service numbers, one mistake and empty bank account