विनाकार्ड पैसे काढा, डेबिट कार्डमुक्त देश बनवण्यासाठी एसबीआयचं मोठं पाऊल

या डेबिट कार्डच्या जागी एसबीआय डिजीटल पेमेंट प्रणाली (SBI Yono Service) आणण्यासाठी काम करत आहे. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

विनाकार्ड पैसे काढा, डेबिट कार्डमुक्त देश बनवण्यासाठी एसबीआयचं मोठं पाऊल

मुंबई : मार्केटमध्ये एटीएम मशिन कमी करुन डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने मोठं पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. एसबीआयची ही योजना (SBI Yono Service) यशस्वी झाल्यास प्लास्टिक डेबिट कार्ड इतिहासजमा होईल. या डेबिट कार्डच्या जागी एसबीआय डिजीटल पेमेंट प्रणाली (SBI Yono Service) आणण्यासाठी काम करत आहे. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

रजनीश कुमार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना याबाबत माहिती दिली. डेबिट कार्ड वापरातून बाहेर करणं एसबीआयची योजना आहे. डेबिट कार्डचा वापर बंद केला जाऊ शकतो याबाबत आम्ही आश्वस्त आहोत, असं रजनीश कुमार म्हणाले.

देशात 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडिट कार्डधारक आहेत. योनो (SBI Yono Service) या डिजीटल प्लॅटफॉर्ममुळे देश डेबिट कार्डमुक्त होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही रजनीश कुमार यांनी व्यक्त केली.

योनोच्या माध्यमातून एटीएम मशिनमधून पैसे काढले जाऊ शकतात आणि दुकानातून सामानही खरेदी केलं जाऊ शकतं. एसबीआयने अगोदरच 68 हजार योनो पॉईंटची निर्मिती केली आहे आणि येत्या 18 महिन्यात हे पॉईंट्स 10 लाखांपर्यंत वाढवण्याचं नियोजन असल्याची माहिती रजनीश कुमार यांनी दिली.

एसबीआयने यावर्षी मार्चमध्ये योनो कॅश सेवा सुरु केली होती, ज्यामुळे ग्राहकांना डेबिट कार्ड नसतानाही पैसे काढता येतात. ही अत्यंत सुरक्षित आणि सोपी सुविधा मानली जाते. सुरुवातीला ही सुविधा 16 हजार 500 एटीएममध्ये उपलब्ध होती, जी आता सर्व एटीएममध्ये उपलब्ध व्हावी यासाठी बँक काम करत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *