AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market Fall : गुंतवणूकदारांचे डोळे पांढरे, शेअर बाजार कोसळल्याने इतक्या हजार कोटींचा फटका

Share Market Fall : शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी गडगडला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्स 1600 अंकांनी खाली आला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराने मोठी झेप घेतली होती. सलग 11 दिवसांच्या तेजीनंतर घसरण सुरु आहे. काय आहे यामागील कारण

Share Market Fall : गुंतवणूकदारांचे डोळे पांढरे, शेअर बाजार कोसळल्याने इतक्या हजार कोटींचा फटका
| Updated on: Sep 21, 2023 | 5:10 PM
Share

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : भारतीय शेअर बाजाराने (Share Market Fall) सलग तिसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांच्या पदरात निराशा घातली. या तीन दिवसांत सेन्सेक्स 1,600 अंकांनी घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले. या घसरणीच्या सत्रापूर्वी सेन्सेक्स सलग 11 दिवस तेजीत होता. 2007 नंतर ही सर्वात मोठी रॅली ठरली. पण त्यानंतर शेअर बाजाराने या आठवड्यात अचानक घुमजाव केले. सोमवारी 242 अंक, बुधवारी 796 अंकांची तर आज जवळपास 600 अंकाची घसरण आली. मंगळवारी गणेश चतुर्थीमुळे बाजार बंद होता. या घसरणीमुळे बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारातील भांडवल 3.9 लाख कोटी रुपयांहून कमी होऊन 319.5 लाख कोटी रुपये झाले.

या घटकांचा परिणाम

अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताच बदल केला नाही. पण पुढे 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षी यामध्ये 50 बीपीएसची कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात काही वेळ दबाव राहण्याची शक्यता आहे. दीर्घकाळासाठी उच्चांकी व्याजदर बाजारासाठी योग्य नाहीत, त्यामुळे बाजारावर विपरीत परिणाम होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. बाजार अनेक दिवस उच्चांकावर राहू शकत नाही, त्यामुळे निर्देशांकावर त्याचा परिणाम दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कारण तरी काय

  • अमेरिकेतील महागाई अजूनही आटोक्यात आलेली नाही
  • अजून काही दिवसात महागाई कमी होण्याची चिन्ह नाहीत
  • अमेरिकन तिजोरीवर ताण वाढत आहे
  • डॉलर इंडेक्स 105.59 अंकावर पोहचला आहे
  • 19 मार्च नंतर हा डॉलर निर्देशांकाचा सर्वात उच्चांकी स्तर आहे
  • कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. लवकरच हा भाव 100 डॉलर प्रति बॅरल होईल
  • कच्चा तेलामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची भीती आहे
  • कॅनडा-भारत वादाची फोडणी पण घसरणीला कारणीभूत आहे

असा दिसेल परिणाम

निफ्टी सध्या त्याच्या उच्चांकावर ट्रेड करत आहे. त्याचा फटका मिडकॅप आणि स्मॉलकॅपला बसण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्रीचे सत्र आरंभले. या महिन्यात आतापर्यंत परदेशी पाहुण्यांनी 5,213 कोटी रुपयांची विक्री केली. निफ्टीने घेतलेल्या माघारीने गुंतवणूकदार हतबल झाले. त्यांचे चार लाख कोटींचे नुकसान झाले आहे. बाजारातील ही पडझड गुंतवणूकदारांच्या उत्साहावर पाणी फेरणारी ठरली आहे. तरीही काही कंपन्यांनी या कोसळधारेत धमाकेदार कामगिरी बजावली आहे.  तर काही दिग्गज कंपन्यांना मोठा सूर गवसला नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.