AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

53 रुपयांच्या शेअरनं गुंतवणूकदारांचे खिसे भरले, एका वर्षात तब्बल 1300 टक्के परतावा

सबेक्स त्यांच्या ग्राहकांना व्यावसायिक व्यवहार सुरक्षित आणि योग्य प्रकारे करण्यामध्ये मदत करते.  Share Market Subex Ltd

53 रुपयांच्या शेअरनं गुंतवणूकदारांचे खिसे भरले, एका वर्षात तब्बल 1300 टक्के परतावा
Money
| Updated on: May 03, 2021 | 3:14 PM
Share

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारामध्ये घसरण पाहायला दिसत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम शेअर बाजारावर दिसत असून दुपारी बाजार 360 अंकांच्या घसरणीसह सुरु होता. शेअर बाजारातील प्रमुख गुंतवणूकदारांनी सध्या विचारपूर्वक बाजारात एंट्री करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. कोरोनाच्या संकटकाळात बंगळुरुची एका कंपनीचा व्यवसाय मात्र तेजीत सुरु आहे. त्या कंपनीचं नाव सबेक्स लिमिटेड आहे. सबेक्सचा एक शेअर 53 रुपयांचा आहे. तर, त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 1300 टक्के परतावा मिळत आहे. ( Share Market News Subex Ltd is multi bagger share gave 1300 percent return to investors in one year)

सबेक्स कंपनीचं नेमकं काम काय?

बंगंळुरु येथील Subex Ltd.ही सॉफ्टवेअर कंपनी आहे. कम्युनिकेशन सर्विस प्रोवाईडर्सला डिजीटल सपोर्ट देण्याचं काम कंपनीच्यावतीनं केलं जातं. डिजीटल अर्थव्यवस्था वाढतेय त्यानुसार कंपनीचा विस्तार होत आहे. ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना व्यावसायिक व्यवहार सुरक्षित आणि योग्य प्रकारे करण्यामध्ये मदत करते.

53 रुपयांवर शेअर ट्रेडिंग

सबेक्स कंपनी शेअर बाजारात 53 रुपयांच्या स्तरावर ट्रेडिंग करत आहे. कंपनीनं त्यांच्या ग्राहकांना एका महिन्यात 43 टक्के, तीन महिन्यात 112 टक्के आणि एका वर्षात 1253 टक्के रिटर्न दिला आहे. तीन वर्षांमध्ये कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या व्यक्तींना 600 टक्के परतावा मिळाला आहे. शेअर मार्केटमधील कंपनीची मार्केट कॅप 3 हजार कोटी रुपये आहे. Subex Ltd कंपनीच्या आर्थिक स्थितीवर नजर टाकली असता जून 2020 च्या तिमाहीमध्ये कंपनीला 88 कोटींचं उत्पन्न मिळाल्याचं दिसतं. सप्टेंबरच्या तिमाहीत उत्पन्न 93 कोटी आणि डिसेंबरच्या तिमाहीत उत्पन्न मिळालं आहे. तर कंपनीला जून 2020 पासून अनुक्रमे 15 कोटी, 12 कोटी आणि 8 कोटींचा फायदा प्रत्येक तिमाहीत झाला आहे.

इतर बातम्या

मोठी बातमी! 24 लाख एकर शेतीत काय पिकतंय? सरकारचे माहिती देण्याचे आदेश

अमरावती, यवतमाळ, अकोल्यातील कोरोना प्रभाव क्षेत्रात तातडीने कंटेन्मेंट झोन जाहीर करा; मुख्य सचिवांचे निर्देश

( Share Market News Subex Ltd is multi bagger share gave 1300 percent return to investors in one year)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.