मोठी बातमी! 24 लाख एकर शेतीत काय पिकतंय? सरकारचे माहिती देण्याचे आदेश

कुणाच्या शेतात काय पिकतं किंवा कोणता शेतकरी काय पिक घेतोय याची अचूक माहिती सहजासहजी मिळणं तसं कठिक काम आहे.

मोठी बातमी! 24 लाख एकर शेतीत काय पिकतंय? सरकारचे माहिती देण्याचे आदेश
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 10:41 PM

नवी दिल्ली : कुणाच्या शेतात काय पिकतं किंवा कोणता शेतकरी काय पिक घेतोय याची अचूक माहिती सहजासहजी मिळणं तसं कठिक काम आहे. मात्र, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अधिकाऱ्यांना ‘मेरी फसल-मेरा ब्यौरा’ (Meri Fasal Mera Byora) या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या पिकांची सर्व माहिती भरण्याचे आदेश दिलेत. विशेष म्हणजे एखाद्या शेत जमिनीत काहीही पिक नसेल ते शेत रिकामं असेल तर त्याचीही माहिती देण्यास सांगण्यात आलंय. हरियाणा शेतकरी कल्याण प्राधिकरणाच्या बैठकीत खट्टर यांनी हे निर्देश दिलेत (Government order to collect all information of Farmers crop in Meri fasal mera byora scheme).

अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री खट्टर यांना सांगितलं, “सध्या राज्यात 92 लाख एकर जमिनीची (Farm Land) नोंद आहे. त्यातील जवळपास 68 लाख जमिनीवर शेती केली जाते.” यावर खट्टर यांनी उरलेल्या 24 लाख एकर शेतीवर काय आहे, त्या शेतीचा उपयोग कशासाठी होतोय याची माहिती जमा करण्यास सांगितलंय. ‘मेरी फसल-मेरा ब्यौरा’ योजनेत पिकांच्या नोंदीची ठोस पद्धत असावी. जेणेकरुन भविष्यात शेतकऱ्यांना त्यांची संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यावर देता येईल, असंही खट्टर म्हणाले.

केवळ शेतीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार नाही

मनोहर लाल खट्टर म्हणाले, “केवल शेतीतून शेतकऱ्यांचं उत्पन्न पाहणं कठिण आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी फुल शेती, पशुपालन आणि मत्स्यपालन सारख्या शेतीशी संबंधित जोडधंद्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल. सुरुवातीला सोनीपत, झज्जर, गुरुग्राम आणि फरीदाबाद या 4 जिल्ह्यांसाठी योजना तयार कराव्यात. जेणेकरुन स्थानिक गरजेनुसार शेती करता येईल.”

शेतकरी कल्याण प्राधिकरणाचं काम काय?

मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, “हरियाणा शेतकरी कल्याण प्राधिकरणाचं काम शेतकऱ्यांचं कल्याण करणाऱ्या आणि त्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या योजनांची देखरेख करणं हे आहे. या योजना योग्य पद्धतीने राबवल्या जातील यासाठी नियोजन करणं. या अंतर्गत भूमिहीन शेतकऱ्यांसह इतर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी काही योजना संबंधित विभागाच्या लक्षात आणून देणं, सूचना करणं अशीही कामं हे प्राधिकरण करतं.”

हेही वाचा :

सीएनजी ट्रॅक्टरमुळे वाढणार शेतकऱ्याचे उत्पन्न, जाणून घ्या शेतकऱ्याला होणारे फायदे

Cow Milk Rates | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गाईच्या दूध खरेदी दरात वाढ

आफ्रिकन शेळीने नेवाशातील शेतकऱ्याचं नशीब पालटलं, एका शेळीला बुलेटची किंमत!

व्हिडीओ पाहा :

Government order to collect all information of Farmers crop in Meri fasal mera byora scheme

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.