AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसासोबत मुंबईचा शेअर बाजारही गगडला; 18 कंपन्यांचे शेअर्स पडले

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात निरुत्साह पहायला मिळाला. सकाळी मार्केट उघडताच अवघ्या काही वेळांतच अनेक कंपन्यांचे शेअर घरसले. दिवसाअखेरीसही हीच स्थिती होती. व्यवहाराच्या शेवटी बाजार सपाट बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 8.03 अंकांनी म्हणजेच 0.02 टक्क्यांनी घसरून 53,018.94 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 18.85 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 15,780.25 वर बंद झाला.

पावसासोबत मुंबईचा शेअर बाजारही गगडला; 18 कंपन्यांचे शेअर्स पडले
शेअर बाजारImage Credit source: tv9
vanita kamble
vanita kamble | Updated on: Jul 01, 2022 | 7:15 PM
Share

मुंबई : मुंबईत तुफान पाऊस(Rain) पडत असताना या मुसळधार पावसासह मुंबईचा शेअर बाजारही गगडला आहे(stock market crashed). सकाळी व्यापार सुरु होताच शेअर बाजारात पडझड पहायला मिळाली. बाजार बंद होताना देखील घसरण कायम होती. सेन्सेक्स 110 अंकांनी 52,900 वर बंद झाला तर निफ्टी 28 अंकांनी 15,750 वर बंद झाला. तब्बल 18 कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत. यामुळे गुंतवणुक दारांचे करोडो रुपये या घसरणीत बुडाले आहेत.

दिवसभर शेअर बाजारात घसरण

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात निरुत्साह पहायला मिळाला. सकाळी मार्केट उघडताच अवघ्या काही वेळांतच अनेक कंपन्यांचे शेअर घरसले. दिवसाअखेरीसही हीच स्थिती होती. व्यवहाराच्या शेवटी बाजार सपाट बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 8.03 अंकांनी म्हणजेच 0.02 टक्क्यांनी घसरून 53,018.94 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 18.85 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 15,780.25 वर बंद झाला.

18 कंपन्यांचे शेअर्स पडले

शुक्रवारी दिवसभरात तब्बल 18 कंपनांच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली. मारुती, कोलइंडिया, आयसीआयसीआय बँक, रिलायंससह तर 32 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

खासदारांच्या फुकट प्रवासासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 5 वर्षात मोफत रेल्वे प्रवासावर 64 कोटींचा खर्च

देशातील वर्तमान खासदारांसोबतच माजी खासदारांच्या (MPs and Former MPs) आवोभगतीसाठी केंद्र सरकारने कोट्यवधींचा चुरडा केल्याचे समोर आले आहे. खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासासाठी (free train journey)थोडे थोडके नव्हे तर तब्बल 62 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांत ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. म्हणजेच संसदेच्या सदस्यांनी (Member of Parliament) देशभरात केलेल्या मोफत प्रवासासाठी केंद्र सरकारने 62 कोटी रुपये मोजले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतू,ज्या कोरोना काळात देश लॉकडाऊनमध्ये होता, त्या काळातही खासदार महाशयांनी मोफत रेल्वे प्रवास केला आहे. या सुविधाचा खासदारांनी दणकावून फायदा उठवला आहे. माहिती अधिकार कायद्याचा (Right to Information) वापर करत ही माहिती उघड झाली आहे. एकीकडे फुकट्या प्रवाशांवर दातओठ खात कारवाईचा आसूड उगवणा-या रेल्वे खात्याने मात्र या सुविधेवर कसलीच ओरड केलेली नाही. 2020-21 या काळात खासदारांनी जवळपास 2.5 कोटी रुपयांचा मोफत रेल्वे प्रवास केला आहे.

RTI मध्ये मोफत प्रवासाची माहिती

मध्यप्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात खासदारांच्या रेल्वे प्रवासाविषयी माहिती मागितली होती. लोकसभा सचिवालयाने त्यांना आरटीआय अंतर्गत ही माहिती दिली आहे. त्यात सध्याच्या खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासावर 35.21 कोटी तर माजी खासदारांच्या रेल्वे प्रवासासाठी 26.82 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती दिली. हा सर्व खर्च 2017 ते 2022 या कालावधीत करण्यात आला आहे. 2020-21 या काळात देश कोरोनाशी दोन हात करण्यात गुंतलेला असताना खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासावर या काळात 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये सध्याच्या खासदारांच्या मोफत प्रवासावर 1.29 कोटी तर माजी खासदारांच्या मोफत रेल्वे प्रवासावर 1.8 कोटी रुपयांचे बिल आले.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?