AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : आता खरेदीची सुवर्णसंधी! खुणावतोय सराफा बाजार

Gold Silver Rate Today : गेल्या दीड महिन्यांपासून सोने-चांदीत नरमाईचे धोरण आहे. त्यामुळे अनेकांना सराफा बाजाराची ओढ लागली आहे. पण झालं असं उलटंच

Gold Silver Rate Today : आता खरेदीची सुवर्णसंधी! खुणावतोय सराफा बाजार
सराफा बाजाराचं म्हणणं तरी काय
| Updated on: Jun 13, 2023 | 9:14 AM
Share

नवी दिल्ली : देशात गेल्या दीड महिन्यांपासून सोने-चांदीत (Gold Silver Rate Today) नरमाईचे धोरण आहे. जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदीचे भाव घसरणीवर आहेत. सोन्यात आठवड्यातून दोन दिवसच भावात वाढ दिसून येत आहे. भाव आजही 60,000 रुपयांच्या आतबाहेर खेळत आहे. चांदीत पण मोठी उसळी दिसलेली नाही. सोन्याचे भाव 1100 रुपयांच्या आसपास वधारले आहेत. मेनंतर जून महिन्यात पण सोने-चांदीने हेच नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने दरवाढीचे नवीन रेकॉर्ड तयार केले होते.

जागतिक बाजारातील घडामोड टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, यावर्षीच्या सुरुवातीला सोन्याने ग्राहकांना मोठा झटका दिला होता. पण सध्या नरमाईचा काळ सुरु आहे. सोन्यात दर आठवड्याला 200-250 रुपयांची घसरण दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून हे धोरण सुरु आहे. 4 मे 2023 रोजी जागतिक बाजारात सोने 2075 डॉलर प्रति औस होते. त्यानंतर ते 2080 डॉलर प्रति औसवर पोहचले.

5 टक्क्यांची घसरण गेल्या महिन्याभरात सोन्याच्या किंमती 5 टक्क्यांनी घसरल्या असून भाव 6000 रुपये प्रति ग्रॅमपेक्षा पण खाली आल्या आहेत. देशातंर्गत सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचा दावा इंडियन बुलियन आणि ज्वैलर्स असोसिएशनने केला आहे. सध्या सोने खरेदीसाठी ग्राहकांना अनुकूल काळ असल्याचे पण आयबीजेएने म्हटले आहे.

पण झालं असं उलट सोने-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. तरीही बाजाराकडे ग्राहकांची पावले वळली नसल्याचा दावा आयबीजेएने केला आहे. भावात घसरण झाली असतानाही मागणीत त्या तुलनेत काहीच वाढ झाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. केवळ 5-10 टक्केच मागणी वाढल्याने सराफा बाजार ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे.

सोने-चांदीचा भाव काय आज 13 जून 2023 रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदीचे दर जाहीर झालेले नाहीत. 12 जून रोजी 22 कॅरेट सोन्यात 100 रुपयांची घसरण होऊन भाव 55,550 रुपयांवर पोहचले. तर 24 कॅरेट सोने 100 रुपयांनी घसरल्याने हा भाव 60,600 रुपयांपर्यंत घसरले. गुडरिटर्न्सने हे भाव जाहीर केलेले आहेत. शुक्रवारी सोन्यात 400 रुपयांची वाढ झाली तर चांदीने 1100 रुपयांची चढाई केली होती.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव सोमवारी 24 कॅरेट सोने 59921 रुपये, 23 कॅरेट 59682 रुपये, 22 कॅरेट सोने 54887 रुपये, 18 कॅरेट 44940 रुपये आणि 14 कॅरेट सोने 35053 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?