Petrol Diesel Price Today : ठाणे, पुणेकरांसाठी स्वस्ताईची सकाळ! इंधनाचा काय भाव आहे आज तुमच्या शहरात

Petrol Diesel Price Today : आज राज्यात ठाणे, पुणेकरांना इंधनासाठी जास्त दाम मोजावे लागणार नाहीत. तर इतर शहरात मात्र पुण्यापेक्षा प्रति लिटर दोन ते अडीच रुपये जास्त मोजावे लागतील.

Petrol Diesel Price Today : ठाणे, पुणेकरांसाठी स्वस्ताईची सकाळ! इंधनाचा काय भाव आहे आज तुमच्या शहरात
कुठे स्वस्त, कुठे महाग
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 8:37 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलामध्ये चढउताराचे सत्र सुरु आहे. पण डॉलरच्या किंमतींवर होणाऱ्या परिणामांमुळे त्यामध्ये मोठी उसळी आली नाही. अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्ह, व्याजदर वाढीचे संकेत मिळत असल्याने कच्चे तेल, सोने-चांदी दबावाखाली आहे. या महिन्यापासून ओपेक प्लस देशांनी तेल उत्पादन घटविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करतील. चीनने झिरो कोविड धोरण गुंडाळल्याने तिथे इंधनाची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही दिवसांत कच्चा तेलाच्या किंमतींचा भडका उडण्याची शक्यता आहे. आज राज्यात ठाणे, पुणेकरांना इंधनासाठी (Petrol Diesel Price) जास्त दाम मोजावे लागणार नाहीत. तर इतर शहरात मात्र पुण्यापेक्षा प्रति लिटर दोन ते अडीच रुपये जास्त मोजावे लागतील.

कच्चा तेलाची उसळी आज 30 एप्रिल रोजी कच्चा तेलाने उसळी घेतली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) आज 76.78 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) वधारुन 80.33 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले.

रशियानंतर इराक धावला रशिया पाठोपाठ आता इराक भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे प्रत्येक बॅरलमागे दोन रुपयांची बजत होत आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.

हे सुद्धा वाचा

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.73 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.82 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.73 पेट्रोल आणि डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.43 आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.36 तर डिझेल 93.85 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.45 तर डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.71 तर डिझेल 95.15 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.12 रुपये आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 108.03 तर डिझेल 94.49 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.91 आणि डिझेल 92.43 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.64 रुपये तर डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
  15. ठाणे पेट्रोलचा दर 105.74 रुपये तर डिझेल 92.24 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....