AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! स्पाईसजेटचं उद्यापासून 28 देशांतर्गत नवीन उड्डाण सुरू, ‘या’ मार्गांसह संपूर्ण तपशील जाणून घ्या

स्पाईसजेटने या वर्षी 26 नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेशातील कुशीनगर आपल्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये जोडण्याची घोषणा केली. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून 26 नोव्हेंबरपासून कुशीनगर ते दिल्लीदरम्यान पहिले विमान चालवले जाईल. स्पाईसजेटने 18 डिसेंबरपासून कुशीनगरला मुंबई आणि कोलकातासोबत जोडण्याची घोषणाही केली.

आनंदाची बातमी! स्पाईसजेटचं उद्यापासून 28 देशांतर्गत नवीन उड्डाण सुरू, 'या' मार्गांसह संपूर्ण तपशील जाणून घ्या
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 30, 2021 | 3:31 PM
Share

नवी दिल्ली : बजेट वाहक स्पाईसजेट 31 ऑक्टोबरपासून 28 नवीन देशांतर्गत उड्डाणे सुरू करणार आहे. हिवाळी हंगामाचा भाग म्हणून एअरलाईन राजस्थानमधील जयपूर, जैसलमेर, जोधपूर आणि उदयपूर या पर्यटन स्थळांना प्रमुख महानगरे आणि शहरांसह जोडणारी अनेक नवीन नॉन-स्टॉप उड्डाणे सुरू करणार आहे. स्पाईसजेट एअरलाईनची ही नवीन उड्डाणे उदयपूरला कोलकाता, बंगळुरू आणि मुंबईशी जोडतील. जैसलमेरला दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि जयपूर, जोधपूरला मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू आणि बागडोग्राला जयपूरशी जोडणारी विमानसेवा सुरू झालीय.

‘या’ मार्गांसाठी उड्डाणे उपलब्ध

स्पाईसजेट बागडोग्राला अहमदाबादशी, कोलकाताला श्रीनगरशी जोडणार असून, बंगळुरू-पुणे मार्गावर दोन नवीन उड्डाणे सुरू होणार आहेत. स्पाईसजेटने उदयपूर-अजमेर, उदयपूर-बागदोरा, उदयपूर-दरभंगा, उदयपूर-गोरखपूर, उदयपूर-दुर्गापूर, उदयपूर-गोवा आणि उदयपूर-गेवियरदरम्यान नवीन विमानसेवा सुरू केलीय.

कुशीनगर विमानतळावरूनही विमानसेवा सुरू होणार

स्पाईसजेटने या वर्षी 26 नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेशातील कुशीनगर आपल्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये जोडण्याची घोषणा केली. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून 26 नोव्हेंबरपासून कुशीनगर ते दिल्लीदरम्यान पहिले विमान चालवले जाईल. स्पाईसजेटने 18 डिसेंबरपासून कुशीनगरला मुंबई आणि कोलकातासोबत जोडण्याची घोषणाही केली.

तुम्ही येथे तिकीट बुक करू शकता

स्पाईसजेट फ्लाइट सेवेसाठी तुम्ही कंपनीची अधिकृत वेबसाईट spicejet.com किंवा कंपनीचे अॅप डाऊनलोड करून तिकीट बुक करू शकता.

तिकीट बुक करण्याचा उत्तम पर्याय

तुम्ही दिवाळी किंवा छठपूजेच्या निमित्ताने घरी जाण्याचा विचार करत असाल आणि तेही विमानाने, तर लवकर तिकीट बुक करा. कारण प्रवासाच्या वेळी तिकीट बुक करणे खूप महाग आहे. अनेक ट्रॅव्हल एजन्सी लोकांना फ्लाईट तिकिटांवर उत्तम ऑफर देत आहेत. तुम्ही EaseMyTrip वर कोणत्याही देशांतर्गत फ्लाईटसाठी तिकीट बुक करू शकता. EasyMyTrip तिकिटांवर रु. 2500 पर्यंत सूट देते. यासाठी फ्लाइट तिकिटाचे पैसे भरताना तुम्हाला एक FLYFAMILY वापरावी लागेल. तुम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत travolook.in वर तिकीट बुक केल्यास तुम्हाला अनेक चांगल्या डील मिळतील. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म goibibo देखील तिकीट बुकिंगवर रु. 2000 पर्यंत सूट देत आहे.

संबंधित बातम्या

भारतीयांचा विश्वास कमी होतोय, माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं विधान

‘या’ कंपनीचा शेअर्स वर्षभरात 17 हजार टक्क्यांनी वाढला, 1 लाखाचे बनवले 1.71 कोटी

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान