AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST AC Sleeper | एसटी महामंडळ पुन्हा मैदानात, खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसी स्लीपर बस सुरु करणार

ST AC Sleeper | खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळ पुन्हा एसी स्लीपर बस सुरु करणार आहे.

ST AC Sleeper | एसटी महामंडळ पुन्हा मैदानात, खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसी स्लीपर बस सुरु करणार
महामंडळ पुन्हा मैदानातImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 15, 2022 | 1:24 PM
Share

ST AC Sleeper | राज्य परिवहन महामंडळ (State Transport Corporation) अर्थात आपली लालपरी पुन्हा एकदा एस सी स्लीपर (AC Sleeper Service) सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. खासगी ट्रॅव्हल्सची (Private Travels) या क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी महामंडळाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने हा प्रयोग राबविला होता. पण भाडे अधिक असल्याने प्रवाशांनी ही सेवा नाकारली होती. त्यानंतर महामंडळाने भाड्यात कपात करत प्रवाशांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात लालपरीला काही यश आले नाही. आता खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या (Long Route) एसी स्लीपर बस प्रवाशांच्या सेवेत सुरु करण्याच्यादृष्टीने चाचपणी सुरु केली आहे. हैदराबाद येथे आयोजित देशभरातील बस ओनर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. या प्रदर्शनात विविध बसचीही पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा एसटीच्या ताफ्यात एसी स्लीपर बसचा समावेश करण्याची चर्चा सुरु झाली आहे.

एसी सी स्लीपर बसचा प्रवास

राज्यात प्रवासी टप्पा वाहतुकीची परवानगी फक्त एसटी महामंडळाला आहे. तरीदेखील राज्यात खासगी ट्रॅव्हल्सची वाहतुक जोमात सुरु आहे. 22 जानेवारी 2018 रोजी परिवहन महामंडळाने एस सी स्लीपर शिवशाही बसची सेवा सुरु केली होती. मुंबई मध्यवर्ती बसस्थानकातून ही सेवा सुरु करण्यात आली होती. परंतु याबसचे तिकिट दर जास्त असल्याने प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविली. त्यानंतर महामंडळाने 9 फेब्रुवारी 2019 रोजी तिकिट दरात कपात केली. परंतु प्रवाशांनी मात्र या बसला काही प्रतिसाद दिला नाही. परिणामी महामंडळाने ही बससेवा बंद केली. त्यानंतर महामंडळाने नोव्हेंबर 2019 मध्ये एकाच बसमध्ये स्लीपर व आसन सुविधा असलेली साधी बस ताफ्यात दाखल केली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात अशा प्रकराच्या 216 स्वमालकीच्या बस आहेत. त्यांना प्रवाशांनी अल्प का असेना प्रतिसाद दिला आहे.

बसची केली पाहणी

हैदराबाद येथे बस प्रदर्शन सुरु आहे. त्याला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चत्रे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. या प्रदर्शनात बस उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांच्या आरामदायी स्लीपर एसी द बसही होत्या. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्लीपर असलेली साडेतेरा मीटर लांबीच्या बसची पाहणी केल्याचे समजते.

ठळक

जानेवारी 2018 रोजी परिवहन महामंडळाने एस सी स्लीपर शिवशाही बसची सेवा सुरु केली

फेब्रुवारी 2019 रोजी तिकिट दरात कपात केली

आता पुन्हा एससी स्लीपर कोच सेवा सुरु करण्याच्या हालचाली

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल