Startups कंपन्यांना अच्छे दिन; चालू वर्षाच्या पहिल्या तीमाहीत उभारले 10.8 अब्ज डॉलरपेक्षा अधिक भांडवल

देशात स्टार्टअपला (Startups) अच्छे दिन आले आहेत. वर्ष 2021 पाठोपाठ 2022 देखील स्टार्टअप कंपन्यांसाठी शुभ संकेत घेऊन आले आहे. 2022 च्या पहिल्या तीमाहित जानेवारी ते मार्चदरम्यान तब्बल 14 स्टार्टअप कंपन्यांना युनिकॉर्न (Unicorn) चा दर्जा मिळाला आहे.

Startups कंपन्यांना अच्छे दिन; चालू वर्षाच्या पहिल्या तीमाहीत उभारले 10.8 अब्ज डॉलरपेक्षा अधिक भांडवल
प्रातिनिधिक फोटो
अजय देशपांडे

|

Apr 10, 2022 | 7:14 PM

देशात स्टार्टअपला (Startups) अच्छे दिन आले आहेत. वर्ष 2021 पाठोपाठ 2022 देखील स्टार्टअप कंपन्यांसाठी शुभ संकेत घेऊन आले आहे. 2022 च्या पहिल्या तीमाहित जानेवारी ते मार्चदरम्यान तब्बल 14 स्टार्टअप कंपन्यांना युनिकॉर्न (Unicorn) चा दर्जा मिळाला आहे. जानेवारी ते मार्च ही सलग तीसरी अशी तिमाही (Quarter) ठरली आहे की या काळात स्टार्टअप कंपन्यांनी दहा अब्ज डॉलरपेक्षा अधिक भांडवल उभारले आहे. यातील 14 स्टार्टअप कंपन्यांचा समावेश हा युनिकॉर्नमध्ये झाला आहे. युनिकॉर्न म्हणजे ज्या कंपन्यांचे भांडवल (Valuation) हे एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक असते तिला युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त होतो. सल्लागार संस्था पीडब्यूसी इंडियाच्या आकडेवारीनुसार चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये स्टार्टअप कंपन्यांनी 10.8 अब्ज डॉलरपेक्षा अधिक भांडवल उभारले असून, यापैकी चौदा कंपन्यांचा समावेश हा युनिकॉर्नमध्ये झाला आहे. या चौदा कंपन्यांसह आता भारतातील एकूण 84 स्टार्टअप कंपन्यांना युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त झाला आहे.

सॉफ्टवेअरशी संबंधित कंपन्यांना सर्वाधिक फायदा

पीडब्यूसी इंडियाच्या रिपोर्टनुसार ज्या स्टार्टअप कंपन्या या सॉफ्टवेअर क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. चालू वर्षाची पहिली तिमाही जानेवारी ते मार्च या कालावधीत या कंपन्यांनी तब्बल 3.5 अब्ज डॉलरचे भांडवल उभारले आहे. गेल्या तीमाहीमध्ये सॉफ्टवेअर क्षेत्राशी संबंधित पाच कंपन्यांचा समावेश हा युनिकॉर्नमध्ये झाला आहे. याबाबत बोलताना पीडब्लूसी इंडियांचे प्रमुख अमित नावका यांनी पीटीआयला सांगितले की, सध्या जागतिक स्थरावर आपल्याला अनिश्चिता पहायला मिळत आहे. मात्र अशा अनिश्चिततेच्या काळात देखील भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी चांगली कामगिरी केल्याचे पहायला मिळत आहे. युकॉर्नचा दर्ज प्राप्त झालेल्या कंपन्यांची भारतातील संख्या आता 84 वर पोहोचली आहे.

स्टार्टअप कंपन्यांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक

स्टार्टअप कंपन्यांमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, भारताच्या पुढे चीन व अमेरिका हे दोन देश आहेत. या यादीत अमेरिका प्रथम, चीन द्वितीय तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. येणाऱ्या काळात स्टार्टअप कंपन्यांच्या बाबतीत भारत आघाडीवर असेल अंस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्याचीच झलक सध्या पहायला मिळत आहे. भारतामध्ये स्टार्टअप कंपन्यांना अच्छे दिन आले असून, गेल्या तिमाहीमध्ये कंपन्यांनी दहा अब्ज डॉलरपेक्षा अधिक भांडवल उभारले आहे.

संबंधित बातम्या

बीएमडब्ल्यूचं मिशन इंडिया : नवं आर्थिक वर्ष मोक्याचं, 24 नव्या गाड्याचं लाँचिंग

वजन कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस ! ‘बीएमआय’ करावा लागेल कमी

पडताळणी: ‘इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलची कमी दरवाढ’ पेट्रोलियम मंत्र्यांच्या दावा खरा की खोटा?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें