SBIआजासून ‘या’ लोकांच्या खात्यात 2489 कोटी पाठवणार, वाचा नेमकं कारण ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) फ्रँकलिन टेंपलेटन म्यूच्युअल फंडमधील (Franklin Templeton) च्या योजनांच्या ग्राहकांना 2489 कोटी रुपये देणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:11 AM, 3 May 2021
SBIआजासून 'या' लोकांच्या खात्यात 2489 कोटी पाठवणार, वाचा नेमकं कारण ?
SBI

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) फ्रँकलिन टेंपलेटन म्यूच्युअल फंडमधील (Franklin Templeton) बंद करण्यात आलेल्या योजनांच्या ग्राहकांना 2489 कोटी रुपये देणार आहे. फ्रँकलिन टेंपलेटन मॅनेजमेंट म्यूच्युअल फंडमधील बंद झालेल्या सहा योजनांच्या ग्राहकांना यापूर्वी 12084 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर, 12 एप्रिलपासून एसबीआयनं 2962 कोटी रुपये दिले आहेत. (State Bank of India will transfer 2489 crore to franklin Templeton unitholders)

फ्रँकलिन टेंपलेटनची माहिती

फ्रँकलिन टेंपलेटन म्यूच्युअल फंडच्या प्रवक्त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. एसबीआय म्यूच्युअल फंडच्या सहा योजनांच्या यूनिटधारकांना पुढील हप्त्यातील रक्कम 2488.75 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ज्या गुंतवणूकदारांची केवायसी अपडेट असेल त्यांना 3 मेपासून पैसे देण्यात येतील.

पैसे ऑनलाईन पद्धतीनं जमा होणार

सुप्रीम कोर्टानं बंद करण्यात आलेल्या योजनांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला लिक्विडेटर म्हणून नियुक्त केलं आहे. त्यानुसार गुंतवणूकधारकांना ऑनलाईन पद्धतीनं पैसे पाठवले जाणार आहेत. जे ग्राहक ऑनलाईन पद्धतीनं पैसे स्वीकारण्यास पात्र नसतील त्यांचे पैसे चेक किंवा डीडीद्वारे पाठवले जातील

कोणत्या योजना बंद?

फ्रँकलिन इंडिया लो डुरेशन फंड (Franklin India Low Duration Fund) , फ्रँकलिन इंडिया डायनामिक एक्यूरल फंड (Franklin India Dynamic Accrual Fund), फ्रँकलिन इंडिया क्रेडिट रिस्क फंड (Franklin India Credit Risk Fund), फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म इनकम प्लान (Franklin India Short Term Income Plan),फ्रँकलिन इंडिया अल्ट्रा शॉर्ट बाँड फंड (Franklin India Ultra Short Bond Fund)आणि फ्रँकलिन इंडिया इनकम अपॉरच्यूनिटीज फंड (Franklin India Income Opportunities Fund) ही त्या योजनांची नावं आहेत. यामध्ये तब्बदल 25 हजार कोटी रुपये गुंतवण्यात आले होते.

संबंधित बातम्या:

SBI खातेदारांना मोठा दिलासा; आता ‘या’ सर्व सुविधा घरबसल्या मिळणार; पण फायदा कोणाला?

खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल; ग्राहकांना होणार मोठा फायदा

(State Bank of India will transfer 2489 crore to franklin Templeton unitholders)