Stock Market Crash : शेअर बाजारावर कोरोनाचे संकट? Sensex 800 अंकांनी गडगडला, बाजार उघडताच हे 10 शेअर धाराशायी

Share Market Crash : देशात कोरोना हातपाय पसरत आहे. काल दिवसभरात एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले. ओमीक्रॉनचे चार सब व्हेरिएंट देशात सक्रिय आहेत. त्याचा धसका आज शेअर बाजाराने घेतल्याचे दिसते. बाजारात कोरोनाचे संकट आल्याचे दिसते. बाजार सुरू होताच गडगडला.

Stock Market Crash : शेअर बाजारावर कोरोनाचे संकट? Sensex 800 अंकांनी गडगडला, बाजार उघडताच हे 10 शेअर धाराशायी
शेअर मार्केट गडगडला
Image Credit source: गुगल
| Updated on: May 27, 2025 | 10:43 AM

Corona Crisis on Stock Market : देशात कोरोनाचे संकट गडद होत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सोमवारी कोविड रुग्णांची संख्या 1009 वर पोहचली. यामध्ये 752 नवीन रुग्णांची भर पडली. तर या नवीन आकडेवारीचा भारतीय शेअर बाजाराने धसका घेतल्याचे समोर आले आहे. सोमवारी Sensex-Nifty दिवसभरात जोरदार उसळला. तर मंगळवारी शेअर बाजाराची सुरूवातच घसरणीने झाली. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा निर्देशांक उघडताच 800 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 81,500 अंकावर कारभार करत आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी -50 हा कालच्या बंदवरून 200 अंकावरून घसरला. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टीसीएसच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली.

सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण

बीएसईच्या सेन्सेक्स इंडेक्स सोमवारी 82,176.45 च्या तुलनेत 82,038.20 अंकावर उघडला. तर काही मिनिटातच हा निर्देशांक जवळपास 800 अंकांनी घसरला. हा निर्देशांक 81,303 अंकावर व्यापार करत होता. सेन्सेक्सप्रमाणेच एनएसई निफ्टीने पण सुरुवातीच्या सत्रात मोठी घसरण दिसून आली. कालच्या 25,001.15 च्या तुलनेत तो घसरून 24,956.65 अंकावर व्यापार करताना दिसला. पण काही मिनिटातच तो 200 अंकांनी घसरून 24,769 अंकावर व्यापार करताना दिसला.

दिग्गज कंपन्यांना फटका

मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली. या लाटेत बड्या कंपन्यांना फटका बसला. सेन्सेक्समध्ये सहभागी कंपन्यांमध्ये सर्वाधिक घसरण अल्ट्राटेक सिमेंटमध्ये दिसली. ही कंपनी 2.26 टक्क्यांनी घसरली. याशिवाय एटरनल (झोमेटो) पासून ते महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, रिलायन्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली.

एका तासात लाखो कोटी स्वाहा

बाजारातील या घसरणीचा परिणाम शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर सुद्धा दिसून आला. बाजाराच्या एकूण भांडवलात मोठी घसरण दिसून आली. बाजार उघडल्यानंतर एका तासाच्या आताच बाजाराचे भांडवल 4,42,42,074.82 कोटी रुपयांवर आले. बाजाराच्या भांडवलात घसरण आल्याने गुंतवणूकदारांच्या सध्या स्टॉक प्राईस व्हॅल्युएशनमध्ये घसरण दिसून आली. हे एक प्रकारे नुकसान आहे.

सेन्सेक्स ज्यावेळी उच्चांकावर होता, त्यावेळी बाजाराचे भांडवल4,46,24,476.96 कोटी रुपये होते. त्यामुळे एकाच तासात गुंतवणूकदारांचे जवळपास 3.82 लाख कोटी रुपये बुडाल्याचे स्पष्ट झाले. सोमवारच्या तुलनेत बाजारातील गुंतवणूकदारांचे नुकसान 4.68 लाख कोटींचे झाले.