शेअर बाजारात या स्टॉकमध्ये कमाईची संधी, या स्टॉकमध्ये आज दिसू शकते तेजी 

शेअर बाजारात या स्टॉकमध्ये कमाईची संधी, या स्टॉकमध्ये आज दिसू शकते तेजी 
शेअर मार्केट

शेअर बाजारात आज एनएचपीसी, गेल, महानगर गॅसच्या तेजीची जोरदार चर्चा आहे. तर श्री रेणुका शुगर, बेस्ट एग्रोलाईफ आणि सांघी इंडस्ट्रीज काय चमक दाखवतील याबाबत गुंतवणुकदार आणि विश्लेषकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 06, 2022 | 9:38 AM

नवीन वर्षात शेअर बाजाराने गुंतवणुकदारांना तेजीचे स्वप्न दाखविले आहे. बुधवारी शेअर मार्केटमध्ये वृद्धीचे संकेत मिळत आहेत. तुम्ही या तेजीतून कमाईची संधी शोधत असाल तर आजच्या बाजारावर आणि निर्देशंकावर लक्ष ठेवा. आज या शेअरमध्ये चढाईचे संकेत आहेत. थोडे संशोधन आणि अभ्यास तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही कमाईच्या संधी शोधू शकता. गुंतवणूक आणि कमाईसाठी आज हे स्टॉक तुम्हाला मदत करु शकतात.

स्टॉकमार्केटमध्ये नवीन वर्षात कमाईची पंचमी साजरी करण्यात आली आहे. या पाच दिवसात बाजाराने ग्राहकांना फार निराश केलेले नाही. ओमायक्रॉनचे संकट गडद होत असतानाही शेअर बाजाराने दमदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना कमाई करता आली आहे.

या स्टॉकमध्ये बल्क डिलचे संकेत

बल्क डिल म्हणजे सर्वाधिक तरल स्टॉक, ज्यामध्ये कमालीची हालचाल पाहायला मिळू शकते. या शेअरमध्ये गुंतवणुकदार जोरदार खरेदी-विक्री करु शकता. यावरुन या स्टॉकविषयी गुंतवणुकदारांच्या मनात काय खलबत सुरु आहे हे कळते. अशा स्टॉककडे गुंतवणुकदार मोठ्या आशाने बघतात. मोठ्या प्रमाणात होणा-या खरेदी-विक्री होत असल्याने या स्टॉकमध्ये कमाईची संधी उपलब्ध होते. पण तुम्हाला तेवढा टायमिंग साधता आला पाहिजे. नाहीतर काय होईल हे गुंतवणुकदारांना सांगायला नको. मनी कंट्रोलच्या माहितीनुसार, गणेशा इकोस्फेअर, विश्वराजा शुगर  इंडस्ट्रीज आणि ओरिएंट ग्रीन पावर कंपनीमध्ये बल्क डील पाहायला मिळू शकते. या तीनही शेअरमध्ये मोठ्या गुंतवणुकदारांनी विक्रीचे धोरण अवलंबिले होते. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना अभ्यासपूर्ण आणि मार्केट स्थिती याचा अंदाज घ्या आणि तज्ज्ञांचा अंदाज काय आहे या आधारे योग्य तो निर्णय घ्या.

कंपनीसोबत गुंतवणुकदार आणि विश्लेषकांचे बैठक सत्र

कंपनी त्यांच्या भविष्यातील योजना आणि विस्ताराचे धोरण त्यांचे गुंतवणुकदार आणि विश्लेषकांसमोर मांडतात. कंपनीची घौडदौड कोणत्या दिशेने सुरु आहे. कंपनीची वृद्धी दर किती राहिल, कंपनीची झपाट्याने वाढ होईल की संथगतीने याचा अंदाज बांधण्यासाठी कंपन्या गुंतवणुकदार आणि विश्लेषकांसोबत बैठक घेतात. त्यामुळे गुंतवणुकदारांसह विश्लेषकांना कंपनीच्या भविष्यातील विस्ताराचा अंदाज बांधता येतोे. तसेच विचारांच्या देवाणघेवाणमुळे कंपनीवरचा विश्वास पक्का होतो. कंपन्या वर्षातून एकदा-दोनदा अथवा अधिकवेळा अशा बैठकांचे आयोजन करतात. या कंपन्याविषयी विश्लेषकांच्या मताला खूप महत्व असते. गुरुवारी श्री रेणुका शुगर, बेस्ट एग्रोलाईफ तर  सांधी इंडस्ट्रीज, रिनेसां ग्लोबल आणि संसारा इंजिनिअरिंग 7 जानेवारी रोजी गुंतवणुकदार आणि विश्लेषकांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये कंपनीच्या येत्या तिमाहीत, सहामाहीत आणि वर्षभरातील योजनांची माहिती देण्यात येईल.

चर्चेतील शेअर

आज दिवसभर हे स्टॉक बाजारात चर्चेत राहु शकतात. यातील घडामोडी चर्चेचा विषय झाला आहे. यामध्ये एनएचपीसी या कंपनीचा समावेश आहे. कंपनीने ग्रीन एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ ओडिशा सोबतच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.  गेलने ओएनजीसी त्रिपुरा पॉवर कंपनीत 26 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. एलआयसीने महानगर गॅसमधील सहभाग वाढविला आहे. 5 टक्क्यांवरुन हिस्सेदारी 7 टक्के करण्यात आली आहे. गौतम जेम्स 13 जानेवारी रोजी राइट्स इश्यू करण्याची शक्यता आहे.

इशाराः गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास आणि विश्लेषक, तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा. येथे व्यक्त केलेली मते अंदाजावर आधारित आहेत.

संबंधित बातम्या : 

Income Tax Return : चुकीला ‘एकदा’ माफी; 31 डिसेंबरची मुदत टळली, तुमच्यासमोरीला ‘हा’ पर्याय!

Share Market | शेअर मार्केटच्या 5 गोष्टी, ज्यावर आज दिवसभर लक्ष ठेवायलाच हवं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें