
Sukanya Samriddhi Yojana: आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित व्हावे ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. तिचे उच्च शिक्षण, लग्न यासाठी कुणाकडे हात पुढे करण्याची गरज पडू नये असे प्रत्येकाला वाटते. मुलींच्या भविष्यासाठी अनेक गुंतवणूक योजना आहेत. त्यात केंद्र सरकारची ‘सुकन्या समृद्धी योजना’ (SSY) हा एक चांगला पर्याय मानल्या जातो. ही एक आकर्षक योजना आहे. ही पोस्ट ऑफिसच्या योजनांमधील एक चांगली योजना आहे. इतर योजनांच्या मानाने यात चांगला व्याजदर आहे. तर सरकारची पण हमी आहे.
योजनेत 8.2 व्याजदर
जर तुम्ही मुलीच्या भविष्यासाठी एक मोठा फंड तयार करू इच्छित असाल तर ही योजना चांगला पर्याय ठरू शकते. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या तिमाहीसाठी या योजनेत 8.2% व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. आर्थिक शिस्तीच्या जोरावर तुम्ही मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत जवळपास 72 लाख रुपयांची मोठी रक्कम ठेऊ शकता.
कसा तयार होईल 72 लाखांचा फंड?
सुकन्या समृद्धी योजनेत कंपाऊंडिंगच्या म्हणजे चक्रव्याढ व्याजाच्या जादूने मोठा फंड तयार होतो. या योजनेचे मोठे आकर्षण या योजनेच्या मॅच्युरिटीचा नियम आहे. तुम्हाला केवळ 15 वर्षांपर्यंत या योजनेत पैसे जमा करावे लागतील. तर योजना ही 21 व्यावर्षी मॅच्युर होते. म्हणजे अखेरच्या 6 वर्षांत एकही रुपया भरण्याची गरज नाही. तरीही तुमच्या रक्कमेवर व्याज जमा होत राहिल.
असा तयार होईल 72 लाखांचा मोठा फंड
गुंतवणूक रक्कम: जर तुम्ही या योजनेत वार्षिक 1.50 लाख रुपये जमा कराल.
गुंतवणुकीचा कालावधी: ही गुंतवणूक तुम्हाला सलग 15 वर्षांपर्यंत करावी लागेल.
एकूण जमा रक्कम: 15 वर्षांत तुमच्या खिशातून एकूण 22,50,000 रुपये जमा होतील.
व्याज दर: सध्याचा 8.2% दराने(चक्रवाढ व्याज) गणित मांडले तर
21 वर्षानंतर व्याजाच्या रुपाने गुंतवणूकदाराला जवळपास 49,32,119 रुपये मिळतील. तुमची एकूण जमा रक्कम 22.5 लाख आणि त्यावरील व्याज 49.32 लाख मिळून एकूण 71,82,119 रुपये मिळतील ही रक्कम मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्न कार्यासाठी उपयोगी ठरेल. अशाप्रकारे या योजनेत कोणत्याही जोखिमशिवाय तुम्ही मोठा फंड तयार करू शकता.